hitendra thakur
hitendra thakur  
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी आजही हितेंद्र ठाकूर गेमचेंजर! २००१ मध्ये विलासरावांचं सरकार तारलं होतं

ओमकार वाबळे

महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीवरून चर्चा आणि बैठकांनी जोर धरला आहे. सहा जागांसाठी भाजपने सातवा उमेदवार देण्याचं ठरवल्यानंतर या निवडणुकीची चुरस आणखी वाढली. नेहमी परस्पर सहमतीने बिनविरोध होणाऱ्या राज्यसभा निवडणुका वीस वर्षांनंतर पार पडत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेला भाजप सक्षम विरोधक असल्याने आकड्यांची समीकरणं बांधताना मविआला टक्कर देत असल्याचं दिसतंय. (Rajyasabha Election 2022)

आकड्यांच्या गणितानुसार राज्यसभेवर पाच उमेदवारांना पुरेल एवढा मतांचा कोटा आहे. मात्र सहाव्या उमेदवारासाठी एकूण ४२ मतं गोळा करावी लागणार आहेत. त्यासाठी भाजप आणि सत्ताधारी पक्षांची दमछाक होत आहे. अपक्षांवर दिल्लीचा रस्ता ठरणार आसल्याने सर्व पक्षांनी अपक्षांना खूश करण्याचा चंग बांधलाय. यामध्ये सर्वाधिक चर्चा पालघरच्या हितेंद्र ठाकूर यांची आहे. कारण मुख्य पक्ष सोडले, तर बहुजन विकास आघाडी एकमेव पक्ष आहे, ज्याकडे स्वतचे तीन आमदार आहेत. (Hitendra Thakur News)

शिवसेनेचे खासदार राजन विचारे, संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार असलेले सुनील राऊत यांच्या शिष्टमंडळाने हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यांनी पालघरमधून पाय काढताच भाजपचे संकटमोचन गिरीष महाजन यांनी ठाकूर यांच्या कार्यालयात पाय टाकला. दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि शब्द घेऊनच महाजन बाहेर पडल्याचं म्हटल जातंय.

पण ठाणे आणि मुंबईत दबदबा असणाऱ्या भागाजवळील पालघरमध्ये ठाकूर यांचं नाण एवढं कणखर कसं बनलं, याआधी केवळ ठाकूर यांच्या एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार कसं तरलं? आणि आज मतांची गरज असताना ठाकूर सगळ्या पक्षांसाठी इतके महत्वाचे का आहेत, हे जाणून घेऊया!

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे स्वत: आमदार आहेत. क्षितीज ठाकूर आणि राजेश पाटील हे त्यांचे दोघे विधानसभेत आहेत. हितेंद्र ठाकूर वसईतून तर क्षितीज ठाकूर नालासोपाऱ्यातून आमदार आहेत. तर राजेश पाटील भोईसर मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या जोरावर या तीन जागा निवडून आणल्या. बहुजन विकास आघाडीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठींबा दिला. मात्र, अचानक सूत्र फिरली. राष्ट्रपती राजवट लागली, आणि त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजप सत्तेपासून दूर राहणार हे लक्षात येताच ठाकूर यांनी मविआला पाठींबा घोषित केला.

ठाकूर कुटुंबीयांवर ईडीचे छापे

ठाकूर यांच्याशी संबंधित विवा ग्रुपच्या कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. यावेळी त्यांनी मी आणि आमदार क्षितीज ठाकूर यांचा या ग्रुपमध्ये समावेश नसल्याचं सांगितलं. त्यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर आणि अन्य कुटुंबीय या ग्रुपचं काम पाहत असल्याचं स्पष्ट झालं होतं. माझ्या कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने आता मीही मोठा झालो आहे, असा उपरोधात्मक टोला ठाकूर यांनी लगावला होता.

आजही ठाकूर ठरणार गेमचेंजर! विलासरावांचं सरकार तारलं होतं

हितेंद्र ठाकूर ज्याला पाठींबा देतील त्यांच्याकडून विकासाची कामे करून घेतील. २००१ मध्ये विलासराव देशमुख यांचं सरकार अडचणीत आलं होतं. यावेळी ठाकूर यांनी आपल्या एकमताच्या जोरावर वसई-विरारसाठी सूर्या पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. आता यावेळी ते केंद्राच्या विकासाच्या योजना आणतात की राज्य शासनाकडून योजना मंजूर करवून घेतात, यावर ते कोणाला पाठींबा देतात, हे ठरणार आहे.

ठाकूर यांनी वसई-विरारसाठी उसगावं पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. तालुक्यातील ४ नगरपरिषदा आणि ६४ गावांसाठी १०० द.ल क्षमतेची पाणीपुरवठा योजना आखली. काही काळाने ती मंजूरही करून घेतली. जनता दलाचा दबदबा असताना ठाकूर कुटुंबीयांनी पालघर पट्ट्यात स्वतचा दबदबा निर्माण केला. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पताका फडकवली. सध्या बहुजन विकास आघाडीकडे वसई-विरार महानगरपालिका, वसई तालुका पंचायत समिती आणि या भागातील विविध ग्रामपंचायतींमध्ये बहुमत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT