Dilip Walse Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

भोंगा प्रकरण : सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावणार - वळसे पाटील

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरूय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राज ठाकरे यांनी पुण्यातून पुन्हा एकदा 3 मेपर्यंतच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केलाय. त्यानंतर राजकीय पडसाद उमटताना दिसत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीही याची दखल घेतलीय. दिलीप वळसे पाटील यांनी यानंतर पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना महत्वाचे आदेश दिलेत, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

राज्याच्या पोलिस (Police) महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितलीय. येत्या काही दिवसांत राज्यात उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत काय अंमलबजावणी करता येईल, त्या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरूय. आम्ही हा प्रकार अतिशय गंभीरतेनं घेतलाय. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय, तेढही निर्माण करू नये. त्याचबरोबर अशा प्रकारची कृती झाली, तर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.

वळसे पाटील पुढं म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानं २००५ ला निकाल दिला होता. २०१५ साली राज्य सरकारनं काही जीआर (GR) काढले आहेत. त्या जीआरमध्ये लाउडस्पीकरच्या परवानगीसंदर्भातील पद्धत ठरवून दिलीय. त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील. याबाबत अंतिम निर्माण घेण्यापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठकही बोलावून चर्चा करणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack in Satara : पाटण तालुक्यात बिबट्याची दहशत! गवत कापणाऱ्या महिलेवर झडप; हाताचा तोडला लचका, अचानक झालेल्या हल्ल्याने...

Beed News: बीडमध्ये नक्की चाललंय तरी काय? तलावात आढळला अनोळखी मृतदेह; अंगावर एकही कपडा नाही, शरीर पूर्णपणे कुजलेलं...

भाजप आमदाराने मुलाच्या लग्नात वाजवले ७० लाखांचे फटाके, शाही लग्नसोहळ्यातील VIDEO VIRAL

लग्नसंस्थेवर आधारित लग्नाचा शॉट या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

8th Pay Commission Explained: पगार किती वाढणार? उशिरा लागू झाला तर थकबाकी किती मिळेल? पगारवाढीचं संपूर्ण गणित उघड

SCROLL FOR NEXT