hotel renaissance again in limelight this time for maharashtra government formation 
महाराष्ट्र बातम्या

जिथून कर्नाटक सरकार कोसळले तिथूनच महाराष्ट्र सरकारही कोसळणार?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रात चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे काही नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हे मुंबईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाने कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएस सरकारमधील बंडखोर आमदारांना ठेवले होते. त्यानंर या आमदारांच्या जिवावर कर्नाटक सरकार पाडण्यात भाजपला यश आले होते. त्याच पद्धतीने सध्या स्थापन झालेले महाराष्ट्र सरकारही कोसळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनीही ट्विट करून तसे संकेत दिले आहेत. मलिक यांनी म्हटले की, भाजपने या हॉटेलमधून कर्नाटक सरकार पाडले होते. त्याच पद्धतीने आम्हीही याच हॉटेलमधून महाराष्ट्रातील भाजप सरकार पाडून आमचे सरकार स्थापन करू. एक प्रकारे नवाब मलिक यांनी या हॉटेलचा संदर्भ देत भाजप सरकारला इशाराच दिला आहे.


सध्या अस्तित्वात असलेले महाराष्ट्र सरकार खरंच कोसळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, काल (ता.23) भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केले असल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी तसे स्पष्ट केले की भाजपला समर्थन हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे. हा पक्षाचा निर्णय नाही. त्यानंतर राष्ट्रावादीच्या सर्व आमदारांना रेनेसॉं हॉटेलला हलविण्यात आले होते.

पवार साहेबांनी अजून काय करायला हवे, असे म्हणतच जितेंद्र आव्हाडांचे डोळे पाणावले...

दरम्यान, कुमारस्वामीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस सरकार भाजपने पाडले होते. काँग्रेस-जेडीएसचे 13 बंडखोर आमदार भाजपने मुंबईतील याच रेनेसॉं हॉटेलमध्ये निगराणीखाली ठेवले होते. त्यावेळी कर्नाटक काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे हॉटेला आमदारांना भेटण्यासाठी दाखल झाले होते. परंतु, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना बंडखोर कर्नाटक आमदारांसोबतची भेट नाकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT