सध्याच्या राजकीय परिस्थितीवर 'हे' आहे आनंद महिंद्रा यांचं मत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींवर प्रतिष्ठीत उद्योगपती महिंद्रा एंड महिंद्राचे ग्रुप के चेयअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलंय.  महाराष्ट्रातील  'सत्ता'बाजारावर उद्योगपती आनंद महिंद्र यांनी हे ट्विट केलंय. या ट्विटच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टोमणा लगावला आहे. आनंद महिंद्रा यांनी सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे कब्बडीच्या खेळासारखी असल्याचं म्हटलंय. तसा एक व्हिडीओच त्यांनी शेअर केलाय.

महाराष्ट्रात काल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. यावर भाष्य करताना सध्याची राजकीय स्थिती कशी आहे हे दाखवण्यासाठी आनंद महिंद्र यांनी 'या' व्हिडीओ शिवाय चांगलं काहीही नसू नाही असं म्हटलंय. आनंद महिंद्रा यांनी कबड्डीचा एक व्हिडीओ शेअर करून याबद्दल आपलं मत मांडलंय.          

सध्या सोशल मिडियावर कबड्डीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये एका खेळाडूला पकडून कसा संपूर्ण खेळ पालटू शकतो हेच पाहायला मिळतंय. हाच व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलाय. 

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ खरतर 15  नोव्हेंबर रोजी देखील शेअर केला होता. मात्र त्याचाच आढावा देत सदर व्हिडीओ महाराष्ट्राच्या राजकारणाशी मिळता जुळता नाही का ? असं देखील त्यांनी विचारलंय.    

Webtitle : anand mahindra tweets a video on maharashtras current political scenario 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand mahindra tweets a video on maharashtras current political scenario