Loan-on-Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

काय वाटते! किती कोटींचे कर्ज आहे महाराष्ट्रावर

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई - कर्जाच्या डोहात बुडालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे फार मोठे आव्हान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी श्‍वेतपत्रिकेचा आधार घेतला जात असून, ती काढण्यासाठी मंत्रालयातील वित्त विभागात हालचाली सुरू आहेत. राज्याच्या डोक्‍यावर सध्या पावणेपाच लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे, हे ठाकरे यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.

राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून पुढील वाटचाल करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे.

भाजपच्या आणि नंतर शिवसेना सहभागी झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे वारेमाप खर्च करावा लागला आहे. परिणामी, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यावर कर्जाचा डोंगर उभार राहिला आहे.

फडणवीस यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला म्हणजे २०१५-१६ मध्ये शिल्लक कर्ज ३ लाख २४ हजार कोटी होते. तर २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होताना हा आकडा ४ लाख ७१ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचा हा वारसा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. बुलेट ट्रेनचा खर्च १ लाख कोटी, समृद्धी महामार्गाचा खर्च ४८हजार कोटी, मेट्रो प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी इतका आहे.

फडणवीस यांच्या कालावधीत महसुली जमेपेक्षा खर्च सातत्याने वाढत गेला. त्यामुळे सतत तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. महसुली जमा वाढवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या समोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Latest Marathi News Live Update : जमिनीचा बेकायदा ताबा घेत खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला अटक

SCROLL FOR NEXT