Akshay Kumar controversy sakal
महाराष्ट्र बातम्या

Akshay Kumar controversy : शिवाजी महाराज कसे दिसायचे?

शिवाजी महाराज कसे दिसायचे? चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपट सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. नुकतंच अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याच्या या लूकवर नेटकऱ्यांनी मात्र टिकेची झोड उठवली.

नेटकऱ्यांच्या मते शिवाजी महाराज जसे 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात दाखवले आहे तसे दिसायचे नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की शिवाजी महाराज कसे दिसायचे? चला तर जाणून घेऊया. (Akshay Kumar controversy )

१६६४ साली पहिल्यांदा सुरत लूटल्यानंतर तेव्हा अनेक लोकांनी शिवाजी महाराज यांना प्रत्यक्ष पाहिले होते अशातच वखारीतील इंग्रज अधिकारी रेव्हरंड एस्कलिअट यांनी महाराजांनचे त्यावेळीचे वर्णन नोंदवून ठेवले आहे.

या वर्णनात लिहल्या प्रमाणे शिवाजी महाराज उंची ने मध्यम, बांधेसूद शरीर, हालचालीत चपळपणा आणि बोलताना चेहऱ्यावर स्मित हास्य आणि गोरा वर्णाचे होते.

१६६६ साली फ्रेंच प्रवासी थेवेनॉ ह्याने सुरतहून माहिती मिळवून शिवाजी महाराजांचे अद्भूत वर्णन केले. थेवेनॉ नुसार राजे उंचीने लहान होते, रंगाने गोरे होते. त्यांची तेज नजर त्यांच्या बुध्दिमत्तेचे दर्शवायची. राजे यांची प्रकृती चांगली होती.

सुरत लुटल्यानंतर १६६६ साली महाराज आग्राला गेले होते. यावेळी परकालदास याने शिवाजी महाराज यांना पाहिले आणि नोंद केली. परकालदासच्या मते, राजांनी जेव्हा सुरत लुटली त्या समयी त्यांचे वय पस्तीस होते. प्रथमदर्शनी शिवाजीमहाराज उंचीने छोटे आणि सडपातळ दिसतात. त्यांचा रंग विलक्षण गोरा आणि पाहता क्षणी माणूस हिम्मती व मर्दानी दिसायचे. शिवाजी राजे यांना दाढी होती.

शिवाजी अँड हीज टाइम्स या जदुनाथ सरकार लिखित पुस्तकात शिवाजी महाराज यांचे वर्णन सांगताना लिहीले आहे की काळी दाढी व मिशी, लांब कल्ले, सोनेरी रत्नजडित पगडी, त्याला काळा शिरपेच तुरा आणि त्याला खोवलेल्या मोत्याच्या माळा होत्या.

फुलांची नक्षी असलेला पांढरा अंगरखा व त्यावर रेशमी उपरणे असायची. सुती कमरपट्टा, डाव्या बाजूस कमरेला कट्यार आणि डावा हात हा पट्ट्याच्या मुठी मुळे झाकला असायचा तर उजव्या हातात धोप तलवार असायची.

ही सर्व वर्णन ही समकालीन चित्रांशीही तंतोतंत जुळतात. त्यामुळे चित्रपटातही शिवाजी महाराजांचा लूक असाच दाखवला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात दाखवलेल्या लूकवरुन आणखी काय वादंग निर्माण होतोय, हे येणाऱ्या दिवसांत दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT