salon 
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाच्या महासाथीमुळे आपला सलून अनुभव कशाप्रकारे बदलेल?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना विषाणू महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम हा सर्व प्रकारच्या उद्योदधंद्यांवर पडला आहे. यातून स्थानिक उद्योग किंला स्थापित उद्योग असे दोन्हीही वाचू शकले नाहीत. मात्र आता, आरोग्य आणि सामाजिक अंतराचं पालन करत सर्व व्यवहार, उद्योगधंदे हळूहळू सुरळीत होत आहेत. 

टाळेबंदीच्या काळात सलून व्यवसाय आणि ब्यूटी पार्लर व्यवसायाला सर्वाधिक झळ बसली आहे. कारण संपूर्ण टाळेबंदीच्या काळात सलून किंवा ब्यूटी पार्लर पूर्णपणे बंद होते. शिवाय टाळेबंदी आता हळूहळू शिथिल होत असली तरी सलून व्यवसाय पुन्हा सुरळीतपणे सुरु करणे आव्हानच ठरणार आहे. कारण सलून किंवा ब्यूटी पार्लरमध्ये ग्राहकांचा व्यावसायिकाशी शेट संबंध येत असतो. कटींग, मसाज किंवा स्पा सेवा दुरवरुन देणे शक्यच नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या नियमांनुसार ग्राहकांना सेवा देणे व्यावसायिकांसाठी कठीण आहे. 

सलून आणि ब्यूटी पार्लर व्यवसाय कठीण परिस्थितीतून जात असला तर व्यावसायिकांनी नव्या पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. 
मनाली टेलेकर या मुंबईत ब्युटी सलूनचा व्यवसाय चालवतात. त्यांनी सलूनमध्ये सुरक्षा आणि आरोग्य ठेवण्याच्या दृष्टीने आपल्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल केले आहेत. त्यांनी फक्त पूर्वभेटीची वेळ घेतलेल्या ग्राहकांनाच सेवा देण्याचे ठरवले आहे. तसेच थेटपणे चालून येणाऱ्या ग्राहकांना सलूनमध्ये मज्जाव करण्यात येणार आहे.

ग्राहकांना पूर्वीच भेट घेण्याची वेळ दिली जाईल. त्यामुळे सलूनमध्ये जास्तीची गर्दी होणार नाही. याने सामाजिक अंतराचे नियमही पाळले जातील. सलूनच्या दरवाज्याजवळ हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात येईल. पुढची पायरी म्हणून आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या शरीराचे तापमान मोजणार आहोत. आमचा प्रत्येक कर्मचारी पीपीई कीट वापरेल. तसेच तोंडावर मास्क लावेल, असं मनाली यांनी सांगितलं आहे.

खुर्ची, टेबल किंवा इतर साहित्य प्रत्येक दोन तासानंतर निर्जंतुक केले जातील. तसेच नवीन ग्राहकाला सेवा देण्यापूर्वी प्रत्येक कर्मचारी हात साबणाने धुवेल. तसेच प्रत्येकवेळी नवीन हातमोज्यांचा वापर केला जाईल. जेणेकरुन संसर्गाचा धोका कमी होतो, असंही त्या म्हणाल्या आहेत.

मनाली यांनी ग्राहकांकडूनही काही अपेक्षा ठेवल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाने तोंडाला मास्क लावावा असं त्या म्हणतात. शिवाय सलूनला येताना आधार कार्ड किंवा अन्य ओळख पत्र जवळ बाळगावं जेणेकरुन नोंदणी ठेवणे शक्य होते, असं त्या म्हणाल्या आहेत. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या ग्राहकांनी सलूनला येणं टाळावं असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दरम्यान, सलून किंवा ब्यूटी पार्लर व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारने विशेष असे काही नियम तयार केलेले नाहीत. राज्यातील काही भागात सलून किंवा ब्यूटी पार्लर व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. मात्र, भीतीपोटी अनेक लोक सलूनमध्ये जाण्याचं टाळत असल्याचं निदर्शनास येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Latest Marathi News Live Update : मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

साऊथ सुपरस्टारच्या पत्नीने दाखल केली घटस्फोटाची याचिका ! अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचे केले आरोप

Delhi Liquor Scam : ‘सीबीआय’ने घेतली उच्च न्यायालयात धाव; कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

SCROLL FOR NEXT