HSC Exam 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Exam 2023 : १२ वीच्या विद्यार्थ्यांना आज मिळणार हॉल तिकीट, वेबसाइटवर थेट होणार उपलब्ध

महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा २०२३ च्या विद्यार्थ्यांसाठी मोछी बातमी. हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होणार.

सकाळ डिजिटल टीम

HSC Exam 2023 Hall Ticket : .यंदा महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होत असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. माहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या १२ वीची परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये होणार असून या विषयीचे ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करण्यात आलं आहे.

आज सकाळी ११ वाजेपासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकीट उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाइटवर हे हॉलतिकीट्स उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

हॉल तिकीट प्रिंट

फेब्रुवारी-मार्च २०२३साठी १२ वीच्या परीक्षेचे ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट काढून घ्यायची आहेत.

हे प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असं मंडळाने सांगितलं आहे.

या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असं बोर्डाने नोटीसमध्ये सांगितलं आहे.

चुका किंवा बदल

हॉल तिकीटमध्ये काही चुक असल्यास प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन कराव्या.

हॉल तिकीटवरचा फोटो, सही, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातल्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे ताबडतोब पाठवायची, असंही सांगण्यात आलंय.

हॉल तिकीट हरवलं तर?

हॉल तिकीट विद्यार्थ्याकडून हरवलं तर संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने पुम्ही प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा.

फोटो सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सही शिक्का मारावा, अशाही सुचना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT