Nilwande Dam
Nilwande Dam 
महाराष्ट्र

Nilwande Dam: 'मी निधी मागतो फडणवीस तिजोरी खोलून पैसे देतात', एकनाथ शिंदेंच मोठं वक्तव्य

धनश्री ओतारी

'यापुढे कोणत्याही कामाला निधी कमी पडणार नाही. कारण मी फक्त सांगतो आणि ते तिजोरी खोलतात. ' असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (I ask for funds Fadnavis gives money Eknath Shinde's big statement )

निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. (Latest Marathi News)

काय म्हणाले शिंदे?

निळवंडेसाठी ५३ वर्षे वाटं पाहावी लागली. प्रकल्पाबाबत अनेक चढ-उतार आले. झालं गेलं गंगेला वाहिलं आता स्वच्छ पाणी येणार.

मी शेतकऱ्यांचा मुलगा हे काही लोकांना सहन होत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा दिवस रात्र काम करतो. अनेक सूचनांचा आदर करणार हे सरकार आहे. आमचं मंत्रमंडळदेखील दिवस रात्र काम करतात. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. कुणालाही मोबदल्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. काल कॅबिनेट मंत्रीमंडळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलं आहे.

हे सरकार अनेक प्रकल्प मार्गी लावत आहे. प्रत्येक गोष्टीला सरकार प्राधान्य देत आहे. यापुढे कोणत्याही कामाला निधी कमी पडणार नाही. कारण मी फक्त सांगतो आणि ते तिजोरी खोलतात. (Latest Marathi News)

पहिल्या दिवसांपासून आम्ही सामान्यांसाठी काम केलं आहे. सरकारचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मविआ सरकारच्या काळात फक्त एका प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांच्या आयुष्यांत चांगले दिवस येणार. आजदा दिवस हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आहे. ३२ गावातील पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार. (Marathi Tajya Batmya)

नगर जिल्ह्यातील१०७ आणि नाशिक जिल्ह्यातील ११३ गावांना फायदा होणार आहे. सरकारकडून अनेक प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेचा अनेकांना फायदा. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. महायुतीचं सरकार हे सगळ्यांचं सरकार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT