Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

‘शिवसैनिकाला पंतप्रधान झालेलं पहायचंय!’

सकाळवृत्तसेवा

मुंबई - विश्‍वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन ना जाये ही आपली संस्कृती आहे’, पण आपल्यासोबत राजकरण करण्याचा प्रयत्न झाला. ते मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री झालो. शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

शिवसैनिक प्रत्येक संकटात धावून जात आहेत. चक्रीवादळ, कोरोनाच्या संकट काळी शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने झाल्या आहेत. डॉक्‍टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत असून शिवसैनिक कधीही संकटाला डगमगला नाही. शिवसेना हेच वादळ आहे, त्यामुळे आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक सादही घातली. शिवसैनिक हे माझ्याभोवतीचे कवच आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Latest Marathi News Update : केरळमध्ये एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू; सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला

Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Satej Patil on Gokul election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला

SCROLL FOR NEXT