CM Thackeray_PM Modi
CM Thackeray_PM Modi Sakal Media
महाराष्ट्र

"मी जमिनीवरच होतो, हेलिकॉप्टरमधून फोटो सेशन करत नव्हतो"

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाचा (Taukte cyclone) फटका बसलेल्या कोकणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा पार पडला. त्यांच्या या दौऱ्यावरुन भाजपनं त्यांना टार्गेट केलं होतं. दरम्यान, भाजपाच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं असून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावरुन टोला लगावला. (I was on the ground not doing a photo session from a helicopter CM Thackeray slams on BJP)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा शुक्रवारी दौरा केला. दरम्यान, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दोन दिवसांच्या आतमध्ये इथल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पण भाजपने यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटलं की, मुख्यमंत्र्यांनी केवळ तीन तासांच्या दौऱ्यामध्ये राजकीय टिपण्णी करत होते" तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की "मुख्यमंत्री केवळ तीन तासांतचं नुकसानीबाबतचा दौरा कसा करु शकतात?"

दरम्यान, भाजप नेत्यांनी केलेल्या या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ठीक आहे जर माझा दौरा चार तासांचा होता. पण मी कमीत कमी जमिनीवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत होतो, स्वतः फोटोग्राफर असतानाही फोटो काढून घेण्यासाठी हेलिकॉप्टरमधून दौरा केला नाही. मी विरोधकांच्या टीकांवर उत्तर देण्यासाठी इथं आलेलो नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT