Mahadev Jankar esakal
महाराष्ट्र बातम्या

आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार; 'रासप'च्या महादेव जानकरांचा दावा

सल्लाउद्दिन चोपदार

'जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रासप स्वबळावर लढविणार आहे.'

म्हसवड (सातारा) : केंद्राच्या माध्यमातून सिमेंट रस्ते, जिहे-कठापूर योजनेअंतर्गत उत्तर भागातील गावांना पाणी, म्हसवडमधील केंद्रीय एमआयडीसी इत्यादी माण तालुक्यातील सर्वांगीण विकास कामं मीच पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतली. मात्र, म्हसवड एमआयडीसीबाबत (Mhaswad MIDC) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खोडा घातल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलाय.

माजी मंत्री जानकर सातारा जिल्ह्यातील म्हसवडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार आहे, असा दावा करत जानकर पुढं म्हणाले, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह म्हसवड पालिकांच्या निवडणुका रासप (Rashtriya Samaj Paksha) स्वबळावर लढविणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झाला असता का?

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) म्हणतात की, आम्हाला (राष्ट्रीय समाज पक्षाला, RSP) मंत्रिपद दिलं.’ म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली नाही. आम्ही युतीत होतो; म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला. आम्ही युती सोबत नसतो, तर फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झाला असता का?, असा सवाल महादेव जानकर यांनी केलाय. देशातील दोन महत्वाचे पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसचं धोरण हे सारखेच आहे. ‘फोडा-झोडा आणि राज्य करा, छोट्या पक्षाशी दोस्ती करा, सत्ता मिळवा, वापर करा आणि त्यांना सोडून द्या,’ हेच धोरण दोन्ही पक्षांनी राबविलंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

SCROLL FOR NEXT