Sanjay-kakade 
महाराष्ट्र बातम्या

मला राज्यात चांगली संधी मिळेल - संजय काकडे

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘दिल्लीत जाण्यात मला स्वारस्य नव्हतेच, राज्यात काम करण्यात मला ‘इंटरेस्ट’ असल्याचे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे. त्यामुळे ते मला राज्यातच अल्पावधीत चांगली संधी देतील,’’ असे प्रतिपादन भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी द्यायला हवी होती, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

काकडे यांच्या खासदारकीची मुदत २ एप्रिल रोजी संपत आहे. भाजपने राज्यातून रामदास आठवले, उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर काकडे म्हणाले, ‘‘दिल्लीत काम करण्यापेक्षा राज्यात काम करण्यास मला आवडते. याची कल्पना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यांनीही राज्यात लवकरच चांगली संधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे.’’ खासदारकीची मुदत २ एप्रिल रोजी संपत आहे.

त्यानंतर लगेचच राज्यातील समर्थकांसह मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. खडसे यांचे ज्येष्ठत्व लक्षात घेता त्यांना राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT