Shivsena Symbol  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Symbol : ठाकरे गटाच्या युक्तिवादामुळे शिंदे गट अडचणीत? कपिल सिब्बल यांनी बाहेर काढला हुकमी एक्का

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कोणाचा अधिकार आहे? याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्वाची सुनावणी झाली. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे. त्यापूर्वी ठाकरे गटाने संघटनात्मक निवडणुका घेण्याची परवानगी मागितली आहे.

याबाबत आज सुप्रीम कोर्ट महत्वाचा निर्णय देऊ शकते. तसेच शिवसेना पक्षाचे नाव चिन्हावर आज अंतिम निर्णय येईल की सुनावणी पुढे ढकलल्या जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी आज महत्वाचा युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेची माहिती आयोगाला दिली आहे.

ठाकरे गटाचा महत्वाचा युक्तिवाद -

१) शिवसेनेची घटना कायदेशीर नाही असे शिंदे गट कोणत्या आधारावर म्हणते, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे.

२) एकनाथ शिंदे यांनी २०१८ साली पक्षाच्या नेतेपदाची शपथ घेतली होती तर ती कोणत्या आधारावर घेतली होती, असे सिब्बल म्हणाले. 

३) आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केली आहे.

४) नेता निवडीसाठी अर्ज देखील ठाकरे गटाने आयोगात दाखल केला आहे. राष्ट्रीय कार्यकारणी आमच्यासोबत असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले.

५) पक्षाप्रमुख पदाची निवड राष्ट्रीय कार्यकारणीत होऊ शकतो. तसेच शिंदे गटाती कार्यकारणी बेकायदेशीर असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला. 

६) ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त होऊ शकत नाही, ती घटनेनुसार तयार केली आहे, असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडला.

७) शिंदे गटाचे प्रतिज्ञापत्र तपासून पाहा, राष्ट्रीय कार्यकारणीला मुदवाढ द्या - ठाकरे गटाची मागणी

८) ६१ पैकी २८ जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता.

९) लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवे होते, गुवाहाटीला का गेले. पक्षाच्या सभेला शिंदे गटाचे नेते उपस्थित नव्हते.

१०) शिंदे गट राजकीय पक्ष नाही, यांनी कोणतीही राजकीय पक्षाबाबात कुठल्याही अटींची पूर्तता करण्यात आली नाही. आम्ही ही पूर्तता पूर्ण केली आहे, असे कपिल सिब्बल म्हणाले.

११) शिंदे गटाच्या याचिकेत खोटी विधानं करण्यात आली आहेत. हा वाद पक्षाच्या कार्यपद्धतीची व संसदीय पद्धतीची ती थट्टा आहे. आमचे सर्व कागदपत्र योग्य असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले.

१२) तसेच पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते. शिंदे गट शिवसेनाचा भाग नाही.

१३) एकनाथ शिंदे हे मुख्य नेते नाहीत, शिंदे आधी शिवसेनेत होते. तेच शिंदे आता म्हणतात शिवसेना राजकीय पक्ष नाही, हे कसे काय?, शिवसेना बोगस पक्ष कसे म्हणू शकता, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

१४) शिंदे गट प्रतिनिधी सभा घेऊ शकत नाही. प्रतिनिधी सभा घेण्याचे अधिकार कुणालाही नाहीत, असे देखील कपिल सिब्बल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी मोठा आवाज; प्रा. लक्ष्मण हाके यांचे राज्य सरकारला आवाहन, समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाची हाक!

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

SCROLL FOR NEXT