important documents terms and conditions for sarpanch in grampanchayat election 
महाराष्ट्र बातम्या

सरपंच पदासाठी इच्छुक आहात? वाचा, काय आहेत अटी-शर्ती अन् आवश्यक कागदपत्रांची यादी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सध्या गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार सरपंच पदासाठी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ७ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. 

आरक्षण जाहीर झाल्यावर आपल्याकडे अटीशर्ती पूर्ण करणारा उमेदवार असावा. त्याला निवडून आणणे आवश्‍यक असल्याने पॅनेल प्रमुखांना आव्हान ठरणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीबाबत 19 जुलै 2017 रोजी अधिसूचनेत सुधारणा करण्यात आली, तर 5 मार्च 2020 च्या अधिसूचनेत कलम 13 चा पोटकलम 2 अ मध्ये सरपंच शब्दाऐवजी सदस्य शब्द समाविष्ट करण्याबाबत सुधारणा झाली. एवढाच बदल झाला असून अन्य अटी 19 जुलै 2017 रोजी अधिसूचनेच्या सुधारणेतील कायम राहिल्या आहेत. आता सदस्यांमधून सरपंचाची निवड होणार असून निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षण न करता ते निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय झाला. पॅनेल प्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. कायद्यातील तरतुदीत सुधारणा केली असली तरी सरपंच पदासाठीचा उमेदवार हा 1995 नंतर जन्मलेला असेल तर तो 7 वी पास आवश्‍यक आहे. 

उमेदवारी अर्ज भरताना आवश्‍यक अटी - 

  • 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या उमेदवाराचे शिक्षण 7 वी उत्तीर्ण असणे आवश्‍यक. 
  • निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून पासबुक झेरॉक्‍स (राष्ट्रीयकृत बॅंक) अनामत रक्कम भरल्याची पावती
  • वय 21 वर्षे पूर्ण असल्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र सहा महिन्यात दाखल करण्याचे हमीपत्र (राखीव उमेदवारांसाठी), मालमत्ता घोषणापत्र
  • 12 सप्टेंबर 2001 नंतर अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र
  • शौचालय वापरात असल्याचे प्रमाणपत्र, थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र
  • गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती - संबंधित उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत पूर्ण झालेले वय, सरपंच म्हणून निवडून येण्यास अपात्र नाही, उमेदवार ग्राम पंचायतचा ठेकेदार नाही, नियमानुसार देय असलेली कोणत्याही रकमेची थकबाकी शिल्लक ठेवलेली नाही, याबाबत घोषणापत्र उमेदवाराला करावे लागणार आहे. या संबंधित उमेदवाराने गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत घोषणापत्र द्यायचे असून उमेदवाराने स्वत: व पत्नी, पतीच्या व्यवसायाबाबत तपशीलही द्यावा लागणार आहे, आदी कागदपत्रे द्यावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT