Thackeray vs Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : "तुम्ही शिवसेना आहे की नाही हे बहुमत चाचणी..." ; न्यायालयाने शिंदेंच्या वकीलांना खडसावलं

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत सरन्यायाधिश चंद्रचूड यांनी महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. पक्ष फुटीवर प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेण्यात आली. आमदारांना मतदान करता आले कारण अपात्रतेचा निर्णय झाला नव्हता, असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचे सांगितले होते. तसेच शिवसेनेवर दावा सांगताना देखील त्यांनी बहुमताचा दाखला दिला. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिंदे गटाच्या वकीलांना खडसावलं आहे. आमदारांना विधानसभेत मतदान करता आले कारण अपात्रतेचा निर्णय झाला नव्हता. मात्र सरकार अस्थिर करण्यामागच्या कारणांचा विचार व्हावा, असं सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

तुम्ही शिवसेना आहात की नाही, असं महत्वाचं निरीक्षण देखील सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदेंच्या वकीलांना खडसावलं. तर आमदार अपात्र झाले तरी आमच्याकडे बहुमत असल्याचे शिंदे गटाचे वकील निरज कौल म्हणाले.  

तुमच्याकडे विधिमंडळात बहुमत आहे. याचा अर्थ तुम्ही पक्ष होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने बहुमताचा दाखला देत एकनाथ शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं आहे, या पार्श्वभूमिवर न्यायालयाचे हे महत्वपूर्ण निरीक्षण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT