भुकंपाचे आवाज 
महाराष्ट्र बातम्या

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात पुन्हा जमीनीतून आले गुढ आवाज; नागरिक भयभीत

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत शंभर वेळेपेक्षा अधिक हे आवाज आले आहेत.

राजेश दार्वेकर

हिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे जमीनीतील गुढ (Hingoli earthquke pangra area) आवाजाचे केंद्र मानले जाते. या गावासह औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात बुधवार (ता. १९) सकाळी साडेसहा व त्यानंतर एकापाठोपाठ एक असे चार आवाज झाले या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही मात्र गावकरी भयभीत झाले (horror citizens) आहेत. जमीन हादरली असल्याचे गावकरी सांगत आहेत. (In many villages in Hingoli district, a mysterious sound came from the ground again; Citizens scared)

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत शंभर वेळेपेक्षा अधिक हे आवाज आले आहेत. काही वर्षापुर्वी हे आवाज वर्षे, दोन वर्षाला येत असत त्यानंतर हे आवाज सहा महिन्यावर आले मागच्या दोन वर्षात आठ पंधरा दिवसाला असे आवाज ये होते. दोन ते तीन वेळेस येथे भुकंपाचे सौम्य धक्के देखील बसल्याची नोंद लातुर येथील भुमापक यंत्रावर झाली आहे. येथे आलेल्या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही मात्र गावकऱ्यांत भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा - अंत्यसंस्कारवेळी मुलगा पुष्कराज सातव यांने चितेला अग्नी देताच श्री सातव यांच्या मुलीने मम्मी पप्पाला चटके बसताहेत असं म्हणून अश्रूंना वाट मोकळी करुन देत मुलीच्या या वाक्याने उपस्थितांची मने हेलावून गेली.

दरम्यान हे आवाज पांगरा शिंदे गावात आल्यावर या गावालगत असलेल्या औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावात येत आहेत. बुधवारी सकाळी ६. २२ वाजता जमीनीतुन पहिला भला मोठा आवाज आला. त्यानंतर एकापाठोपाठ एक चार आवाज झाले. हे आवाज पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खापरखेडा, खांबाळा तर औंढा तालुक्यातील पिंपळदरी परिसर तर कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, असोला, पोतरा, सोडेगाव, म्हैसगव्हान आदी गावात आले आहेत.

या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही, मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. या आवाजाचे गुढ मात्र अद्याप उकलले नाही येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील तज्ञांनी भेटी दिल्या आहेत. आवाज आल्यावर गावकरी जिल्हा प्रशासनाकडे ही माहिती दिली जाते. दरम्यान आज सकाळी एकापाठोपाठ एक झालेल्या आवाजाने या सर्वच गावातील गावकरी रस्त्यावर आले होते. गावात कोठे काही झाले का याची माहिती घेत होते. जिल्हा प्रशासनाने या आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT