freedom fighter
freedom fighter sakal
महाराष्ट्र

Independence Day: कोल्हापूरातील गव्हर्नर विल्सनचा पुतळा फोडणारा एक क्रांतिकारक अजूनही हयात

सकाळ डिजिटल टीम

१० ऑक्टोबर १९४२. कोल्हापुरात एक मोठी घटना घडली. भर चौकात असलेल्या गव्हर्नर विल्सनच्या संगमरवरी पुतळ्यावर दोन महिलांनी हल्ला केला.ऍसिड ओतून पुतळा विद्रुप करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी हातोड्याने पुतळा फोडून टाकला. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचे नाक कापले गेले. या घटनेचे पडसाद थेट इंग्लंड पर्यंत उमटले. ब्रिटिश पोलिसांनी जंग जंग पछाडलं पण खरे सूत्रधार त्यांना सापडलेच नाहीत. तुम्हाला माहिती आहे का या घटनेच्या सूत्रधारांपैकी एक क्रांतिकारक अजूनही हयात आहेत.

देश स्वतंत्र झाला त्याला ७५ वर्षे होतायत. स्वातंत्र्याचा हा दिवस पाहण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल रक्त सांडल, कित्येकजणांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र सोडलं. हसत हसत फासावर चढले. याच क्रांतिकरकांच्या बलिदानामुळे आज आपली पिढी, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.

आज आपण अशाच एका क्रांतिकरकाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे ही स्वातंत्र्यसैनिक आजही हयात आहेत. हो, हे खरंय. कोल्हापूर जिल्ह्यातील आदगोंडा देवगोंडा पाटील असे या स्वातंत्र्य सैनिकाचे नाव आहे. (independence Day freedom fighter Aadgonda Devgonda Patil from kolhapur in independence movement)

१०७ वर्षाचे आदगोंडा देवगोंडा पाटील यांचा जन्म ०१ ऑक्टोबर १९१६ रोजी त्याचं मुळ गांव सांगवडे येथे झाला. वडिल देवगोंडा पाटील हे पाटील असल्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय व गांवकामगार पाटील म्हणून त्यांची ओळख होती.

हा काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अहिंसा मार्गाने अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता. रेडिओवर व पत्रकामध्ये या बातम्या सुरू असायच्या. त्यातूनच देशसेवेची आदगोंडा पाटील यांना प्रेरणा मिळाली.

त्यावेळी मौजे निम शिरगांव गावाचे थोर सुपुत्र देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे शिरोळ तालुक्यातील तरुणांचे नेतृत्व करत होते.त्यांनाच आदगोंडा पाटील यांनी आपल्या गुरूस्थानी मानलं व देशकार्यास सुरवात केली. चलेजाव चळवळीवेळी रत्नाप्पाण्णा कुंभार हे भूमिगत राहून देशसेवेचे कार्य करीत होते त्यामुळे इंग्रज राजवटीने त्यांच्या विरुध्द पकड वॉरंट काढण्यात आल होतं.

रत्नआप्पा कुंभार यांचे सहकारी म्हणून आदगोंडा देवगोंडा पाटील यांनी १९३७ सालापासून ते देश स्वतंत्र होईपर्यंत स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्षपणे सहभाग नोंदविला. त्यामध्ये जसे गावोगावी जाऊन लोकांना एकत्र करणे, रेल्वे स्थानके पेटवुन देणे, पोस्ट ऑफीस जाळणे, रेल्वे लुटणे, प्रभात फेरी काढणे, सभा घेणे, संघटन करणे. अशा स्वरुपाची कामे करण्यास सुरुवात केली. अशा क्रांतिकार्यात अण्णासाहेब निटवे, मालगोंडा पाटील, शामराव मिणचे, रामचंद्र झेले अशा सहकार्यानी मोलाची साथ दिली.

१० ऑक्टोबर १९४२ रोजी कोल्हापुरात गव्हर्नर विल्सनच्या पुतळ्यावर दोन महिलांनी हल्ला केला.ऍसिड ओतून पुतळा विद्रुप करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी हातोड्याने पुतळा फोडून टाकला. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचे नाक कापले गेले. या घटनेचे पडसाद थेट इंग्लंड पर्यंत उमटले. रत्नाप्पा कुंभार आणि आदगोंडा पाटील हे या घटनेच्या पडद्यामागचे सूत्रधार होते. पुढे गव्हर्नर विल्सनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांची संविधानसभेमध्ये निवड झाली बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली व त्या ऐतीहासिक घटना पत्रकावर देश भक्त रत्नाप्पा कुंभार यांनी सही केली. त्यावेळेस आदगोंडा पाटील हे देखील या घटनेचे साक्षीदार होते. मात्र संधी असूनही आदगोंडा पाटील यांनी मात्र राजकारणात कधीच उडी घेतली नाही.अशा याच्या महान क्रांतिकारकाकडे मात्र अनेक वर्षे शासनाने दुर्लक्षच केलं.

तुम्हाला वाटेल १०७ वर्ष वय असताना ते इतके स्टाँग कसे?

मुळातच कोणतेही व्यसन नसल्यामुळे प्रकृती उत्तम ठेवण्यात त्यांना यश मिळाले. तरुण वयात व्यायाम करणे, जनावरे पोसणे, धारा काढणे आणि शेती कामामुळे त्यांचा व्यायाम होत होता. आजही ते मंदिरात जातात. आपली नातवंडे, पणतू यांना स्वातंत्र्यलढ्याच्या थरारक कथा ऐकवतात. त्यांच्या या कथा आजच्या पिढ्यांना देशप्रेमाच्या प्रेरणा देतात. असे आहेत हे १०७ वर्षीय आदगोंडा पाटील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT