Dhule_NCP 
महाराष्ट्र बातम्या

जयंत पाटलांसमोरच राडा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. धुळे शहरातील केशरानंद लॉन्स येथे मंगळवारी (ता.९) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले. या फ्री-स्टाईल हाणामारीचं कारण काय होतं त्याबाबत अजून माहिती समोर आली नाही. या प्रकारामुळे खानदेशात राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि गावागावातील तरुण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी राज्याचा दौरा काढला आहे. त्यांनी विदर्भातील गडचिरोलीपासून 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱ्याला सुरुवात केली आहे. पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना काही ठिकाणी पक्षांतर्गत वादही उफाळून आल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते भूषण पाटील हे भाषण करीत असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. दोन्ही गटांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर हे प्रकरण हाणामारापर्यंत पोहोचलं. संवाद यात्रेमध्ये हाणामारीचा प्रसंग घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य नेते संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : राष्ट्रवादी अन् मविआ पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार? अजितदादांचा सतेज पाटील यांना फोन

हृदयद्रावक! भीषण अपघातात मामा-भाचीनंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू; कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : नगराध्यक्ष होताच हातात झाडू घेऊन मैथिली तांबे उतरल्या थेट संगमनेरच्या रस्त्यावर

Kolhapur Flashback : रिक्षाचालकांचा घेराओ, सभात्याग आणि गुप्त खेळी; १९८० ची महापौर निवडणूक इतिहासजमा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT