Yashwantrav Chavan google
महाराष्ट्र बातम्या

Yashwantrav Chavan : मोसंबी गुपचूप घरी नेणाऱ्या माणसाला यशवंतरावांनी बोलावले आणि...

नवी दिल्ली येथील १, रेसकोर्स रोड या शासकीय निवासस्थानी यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई २२ वर्षे राहिले.

नमिता धुरी

मुंबई : यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. त्यांनी बॉम्बे राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि नंतरच्या बॉम्बे राज्याच्या विभाजनामुळे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.

१९७९ मध्ये अल्पायुषी चरण सिंग सरकारमध्ये भारताचे उपपंतप्रधान हे त्यांचे शेवटचे महत्त्वाचे मंत्रीपद होते.

ते काँग्रेसचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. ते सामान्य लोकांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या भाषणांतून आणि लेखांतून सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार केला आणि शेतकर्‍यांच्या भल्यासाठी महाराष्ट्रात सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. (interesting incident in Yashwantrav Chavan's life) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

नवी दिल्ली येथील १, रेसकोर्स रोड या शासकीय निवासस्थानी यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई २२ वर्षे राहिले. या बंगल्याच्या मागे विविध फळांची झाडे होती. त्यात मोसंबी लगडलेलीही झाडे होती.

यशवंतरावांच्या बंगल्यातील एका सुरक्षारक्षकाने मोसंब्याच्या झाडावरील १०-१२ मोसंबी काढून घरी नेली. बगिच्याच्या माळ्याने ते पाहिले आणि वेणूताईंकडे तशी तक्रार केली. वेणूताईंनी ऐकून घेतले. त्या काहीच बोलल्या नाहीत.

संध्याकाळी चव्हाणसाहेब घरी आले की रेसकोर्सच्या बंगल्याच्या मागील लॉनवर मोसंबीच्या एका झाडाखालीच बसत. वेताच्या खुर्च्या असत. वेणूताई चहा आणत आणि यशवंतराव शांतपणे त्या गरम चहाचे घोट घेत बसत.

त्या दिवशी असेच घडले. यशवंतरावांना चहा करून देत असताना बागेच्या माळय़ाने केलेली तक्रार वेणूताईंनी यशवंतरावांना सांगितली. यशवंतरावांनी त्या सुरक्षारक्षकाला बोलावले.

ज्या माळय़ाने तक्रार केली होती, त्याला वाटले सुरक्षारक्षकाची आज चांगलीच चंपी होणार. तोही लांब उभा राहिला. यशवंतरावांनी सुरक्षारक्षकाला विचारले,

‘घर में कौन बिमार है..?’

‘मेरी माँ बिमार है.’ सुरक्षारक्षकाने सांगितले.

यशवंतराव म्हणाले, ‘जब तक माँ बिमार है, मोसंबी रोज लेकर जाना, और चाहे तो चार दिन छुट्टी लेना, माँ की सेवा करना. दुनियामे माँ के सिवा और कोई जादा नही है ..’

सुरक्षारक्षकाच्या डोळय़ातून पाणी ओघळले..त्याने चव्हाण साहेबांना नमस्कार केला आणि ज्या माळय़ाने तक्रार केली होती त्याच्या चेहऱ्यावर आपण किती मोठी चूक केली याची अपराधी भावना दिसत होती.

वेणूताई चव्हाणसाहेबांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द कानात साठवून ठेवत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT