International-Internet-Day
International-Internet-Day 
महाराष्ट्र

इंटरनेटच्या आहारी जाणे धोकादायक

सकाळवृत्तसेवा

नाशिक - 45 वर्षांपूर्वी इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने एका संगणकाहून दुसऱ्या संगणकावर संदेश पाठविण्याची ऐतिहासिक घटनेची नोंद झाली होती. इंटरनेटची सुरवात झाल्यापासून काही वर्षांतच इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज इंटरनेट दिन साजरा करताना इंटरनेटचा केवळ वापर करावा, त्याच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

इंटरनेटमुळे अनेक सुविधा एका क्‍लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी मोबाईल इंटरनेट सुरू करून सोशल मीडियावरील मेसेज पाहण्याची सवयदेखील अनेकांसाठी नित्याची झाली आहे. व्यसन जडावे, या पद्धतीने इंटरनेटवर कधी सोशल मीडिया, तर कधी यू-ट्यूब किंवा अन्य गेमिंग ऍप्समध्ये दिवसातील बहुतांश वेळ घालविताना नात्यातील विसंवाद वाढत चालला आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळे व्यायामाच्या अभावातून शारीरिक व्याधी उद्‌भवत असून, झोपेवरील परिणाम व अन्य घटकांमुळे मानसिक आजारांना आमंत्रण ठरले जात आहे. आजच्या स्थितीत इंटरनेटच्या वापराशिवाय अनेक बाबी अशक्‍य असल्या, तरी मर्यादित वापरातून संभाव्य आजार टाळता येऊ शकतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

डेटा ट्रॅफिकमध्ये वाढ
इंटरनेट वापराविषयी "बीएसएनएल'चे महाव्यवस्थापक नितीन महाजन म्हणाले, की पूर्वीपर्यंत कॉल्सच्या आधारे विविध रिचार्ज, बिले निघत होती. परंतु, आज कॉलिंग पूर्णपणे मोफत झालेली असताना कुठली कंपनी किती जास्त डेटा देते, यावर सर्वस्वी अवलंबून आहे. या डेटा संस्कृतीत संवादालाही मर्यादा आली असून, केवळ मॅसेजिंग ऍप्स्‌द्वारे बोलण्याची सवय आताच्या पिढीला झाली आहे. इंटरनेट वापरातून डेटा ट्रॅफिकमध्ये वर्षागणिक दुपटी-तिपटीने वाढ होत आहे. ही गरज भागविण्यासाठी पुरवठादारांना ऑप्टिकल फायबरचे जाळे आणखी विस्तृत करावे लागत असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT