Irshalwadi Landslide esakal
महाराष्ट्र बातम्या

Irshalwadi Landslide : वन विभागाचा आडमुठेपणा इर्शाळवाडीच्या जीवावर.. आदिवासींचा आक्रोश अन् कारवाईची मागणी

खालपूरमधल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि अख्ख गाव त्याखाली गाडलं गेलं.

धनश्री भावसार-बगाडे

Irshalwadi Landslide Death Allegations On Forest Department : खालापूर मधल्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री काळाने घाला घातला अन् अख्ख गाव दरडीखाली गाडलं गेलं. या दुर्घटनेत बचाव कार्य मोठ्याप्रमाणात सुरू आहे. शंभरपेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात आलं आहे. पण अजून अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत.

पण जर वन विभागाने आडमुठेपणा केला नसता तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप आदिवासी करत आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

जंगल असल्याने या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. यापूर्वीही झालेल्या दुर्घटनेंच्या पार्श्वभूमीवर अनेक आदिवासी कुटुंबियांनी पावसाळ्यात आदिवासी वाडीतील घरे सोडून डोंगराखाली जाऊन राहण्याचा विचार केला होता.

पण वनविभागाने त्यांच्या झोपड्या पाडल्या आणि पुन्हा त्या आदिवासींना इर्शाळवाडीचाच आसरा घ्यावा लागला. अन् आता घडलेल्या या दुर्घटनेत संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं.

वन विभागाचा आडमुठेपणा

वन विभागाच्या हद्दीत इर्शाळवाडीच्या आदिवासींनी झोपड्या बांधल्या होत्या. पण एरवी दुर्लक्ष करणाऱ्या वन विभागाने या गरीब आदिवासींच्या झोपड्या पाडल्या. एकदा नाही तर दोन-तीन वेळा वन विभागाने त्यांचा झोपड्या पाडल्या.

कोणताही पर्याय न उरल्याने अखेर गावकरी परत वाडी जाऊन राहू लागले. जर पावसाळा संपेपर्यंत वन विभागाने किमान पावसाळी संपेपर्यंत त्यांच्या जमिनीवर आदिवासींना राहू दिले असते तर या दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचले असते.

दरडग्रस्त यादीत वाडीचे नावच नाही

इर्शाळवाडीवर २०१९ मध्येही पावसाळ्यात दरड कोसळण्याची घटना घडली होती. दगड, गोटे व माती खाली उतरली होती. तरीही या आदिवासी वाडीचे नाव दरडग्रस्त यादीत घेतलेले नव्हते. त्यामुळे या भागातील जंगलात वस्ती असणाऱ्या ठिकाणी सर्वेक्षणासाठी संबंधित अधिकारी पोहचलेच नसल्याचं समोर आलं.

या गावकऱ्या झोपड्या पाडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यता माहित असूनही त्यांच्या झोपड्या पाडल्या म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT