Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

ईडी काय नर्सरी आहे का जिथे लहान मुले खेळतात? नितेश राणेंचा संतप्त सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या कारवायांमुळे चागलचं ढवळलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय ईडीच्या (ED) रडारवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आता भाजपाचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे यांनी म्हटलंय की, मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की, नंदकिशोर चतुर्वेदी हा कुणाचा फ्रंटमॅन आहे? कुणाच्या सांगण्यावरुन चालतोय? तो कुणाचा पार्टनर आहे, याची चौकशी करा. त्याच्या माध्यमातून पैसा फिरलेला आहे. त्यामुळे त्याची चौकशी व्हायला हवी. मार्च 2019 मध्ये आदित्य ठाकरे कंपनीत ते पार्टनर होते. त्यांची नेमकी काय लिंक आहे? जो माणूस हवाला करतो आहे, तो महाराष्ट्रातील सिटींग मंत्र्यासोबत संबंध असतील त्याने महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन उत्तर दिलं पाहिजे ना? चतुर्वेदी यांचा मनसुख हिरण तर होणार नाही ना? याबाबत मला शंका आहे. त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रावर आक्रमण वगैरे म्हणत आहेत, ते यांचं ढोंग आहे. यांना बिझनेसमध्ये मराठी माणूस दिसत नाही. तेंव्हा चतुर्वेदी आणि पटेल हवे असतात. तेंव्हा का नाही मराठी माणूस दिसले? खिशे भरण्याच्या वेळी यांना हे लोक दिसतात. ईडी काय नर्सरी आहे का जिथे लहान मुले खेळतात? सखोल तपास करुनच ते कारवाई करतात. पुरावे बघूनच ते कारवाई करतात. सगळी बाजू तपासूनच ते करतात. ते कुणावरही अन्याय करत नाही. म्हणूनच त्यांनी पुराव्यानिशी संपत्ती जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT