Sambhaji Nagar Shocking The accused in the rape case abducted the minor girl and tortured her rmn00 esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News: महाराष्ट्र हादरला! चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात तरुणांचा सामूहिक बलात्कार

पाचोऱ्यातील घटना; सात तरुणांसह इतर तीन ताब्यात

रुपेश नामदास

पाचोरा: शहरातील चौदा वर्षीय मुलीचा तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडित मुलीला गर्भधारणा झाल्याने खळबळ उडाली आहे. या अमानुष व अमानवी घटनेमुळे शहराच्या नैतिकतेला व वैभवाला काळिमा फासला गेला आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या वृद्ध आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शहरातीलच सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह इतर तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगी २७ एप्रिलला घरातून काही न सांगता निघून गेल्याने तिच्या आजीने नात बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले होते.

पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी तिचा शहरभर शोध घेतला असता ती २८ एप्रिलला भडगाव रोड भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समितीकडे रवाना केले होते.

तेथील यंत्रणेने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदान झाल्याने समितीने पाचोरा पोलिसांना माहिती कळवली. उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे जाऊन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने आपबीती कथन केली.

पीडितेने संशयित सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरुणांनी वेळोवेळी विनयभंग करीत शारीरिकपान संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.

घटनास्थळ आणि घटनेतील संशयितांची ओळख पटविण्यासाठी पीडितेला पाचोरा येथे आणले असता तिने सातही तरुणांची ओळख पटवली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या ६५ वर्षीय वृद्ध आजीने पोलिसात तक्रार दिली.

त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार आदी कलमांसह पोस्को अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंग देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT