Jalkot Nagar Panchayat Election 2022
Jalkot Nagar Panchayat Election 2022 esakal
महाराष्ट्र

Latur : जळकोटच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रभावती कांबळे

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रभावती कांबळे व उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे मन्मथ किडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे (Congress Party) सात, राष्ट्रवादीचे सात, शिवसेनेचे दोन व भाजपचे एक नगरसेवक विजयी झाले आहेत. बुधवारी (ता.नऊ) अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुरेखा स्वामी, मुख्याधिकारी भरत राठोड यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडी (Jalkot Nagar Panchayat) करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडुन एक व उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मन्मथ किडे यांचे एकमेव अर्ज आला होता. (Jalkot Nagar Panchayat NCP Prabhavati Kamble Elected As City President)

पीठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मेंगशेट्टी यांनी दोघांचेही बिनविरोध झाल्याचे घोषित केले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने दोघांचाही सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, नगरसेवक अॅड. तात्या पाटील, संदीप डांगे, लक्ष्मीबाई मंगनाळे, संग्राम नामवाड, मिनाश्री धुळशेट्टे, वर्षा सिद्धेश्वरे, बाबुमियाँ लाटवाले, अश्विनी धुळशेट्टे, सुरेखा गवळे, विनायक डांगे, संगीता धुळशेट्टे, रेखा देवशेट्टे, शिवसेनेचे नगरसेवक शिवलींग धुळशेट्टे, सुमनताई देशमुख आदी उपस्थित होते. (Latur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT