Political esakal
महाराष्ट्र बातम्या

'घरबसल्या ट्विट करत राज्याला उद्देशून भाषण करणं म्हणजे..'

'एखाद्याला फारच काही सांगायचं असेल तर मग १० ते १५ ट्विट करत बसायचं'

सकाळ डिजिटल टीम

'एखाद्याला फारच काही सांगायचं असेल तर मग १० ते १५ ट्विट करत बसायचं'

मुंबई बाँबस्फोटापासून ते जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविणे, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, ‘काश्मीर फाईल्स’चित्रपट या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकांवर १४ ट्विट करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरणात खोचक प्रतिक्रिया येत आहेत. आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही त्यावर फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, अलिकड व्हाट्सअपचं युद्ध आहे. चार चौघांनी जमायचं फोटो काढायचे सोशल मीडियावर पोस्ट करायची आणि नंतर तिथेच एकमेकांना शिव्या द्यायच्या हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एखाद्याला फारच काही सांगायचं असेल तर मग १० ते १५ ट्विट करत बसायचं. घरबसल्या ट्विट करणं, महाराष्ट्राला आणि देशाला उद्देशून भाषण करुन मुद्दे मांडणे हा ट्रेंड झाला असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

दरम्यान, डॉ. आंबेडकर यांचा कलम ३७० ला विरोध होता. मात्र, त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या तत्वांविरोधात काय बोलले जाते?, असे म्हणत फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका केली. दुसऱ्या ट्विटमध्ये ‘काश्मीर फाईल्स’वरील पवार यांच्या भूमिकेचा मुद्दा घेऊन, लांगूलचालन, राजकारण, जातीयवाद या त्यांच्या भूमिका असल्याचा आरोप केला आहे. तर राज्याचे मंत्री नवाब मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला जात असल्याच्या पवार यांच्या विधानाचा उल्लेख फडणवीस यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये केला. इशरत जहाँ निर्दोष असल्याबाबत पवार यांची बातमीच फडणवीस यांनी पोस्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT