Jayant Patil
Jayant Patil Esakal
महाराष्ट्र

Jayant Patil: 'माझी परवानगी घेऊनच 6 महिन्यासाठी शिंदे गटात...',राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांबद्दल पाटलांचे मोठं वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने दौरे, चर्चा, भेटी सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राज्यात दौरे सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (Latest Marathi News)

अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यापूर्वीच सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाला गळती लागली असून राष्ट्रवादीमधील स्थानिक नेते व पदाधिकारी हे शहर आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून पक्ष सोडून जात आहेत.(Latest Marathi News)

सध्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील सोलपूर दौऱ्यावर आहेत.त्यांच्या दौऱ्याआधी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले नेते आणि पदाधिकारी यांच्याबद्दल जयंत पाटील यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की,' शिंदे गटात जे नेते गेलेले आहेत ते तात्पुरते त्या पक्षात असणार आहेत, एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत काही सोई, सवलती, निधी, मिळण्याची शक्यता असल्यामुळे आहेत. तिकडे गेलेल्या लोकांबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही असं ते पुढे म्हणाले.(Latest Marathi News)

तर 'गेलेले नेते परत येऊ शकतील. तर एका कार्यकर्त्याने मला सांगितलं की, जरा 6 महीने जातो जरा निधी आणतो आणि परत येतो. एका महत्वाच्या कार्यकर्त्याने परवानगी मागितली की साहेब मी जातो, नगरपालिकेत निधी मिळणं गरजेचं आहे त्यासाठी जातो आणि परत येतो, नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या म्हटलं' असं पाटील यावेळी म्हणाले त्यानंतर एकदम हशा पिकला.(Latest Marathi News)

दरम्यान राष्ट्रवादीमधील पदाधिकारी व पक्ष निरीक्षक यांच्या कामकाजाला किंवा मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीमधील व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी काल शासकीय विश्रामगृह येथे शहराध्यक्ष, पक्ष निरीक्षक यांवर विविध आरोप करत शिंदे गटात प्रवेश केला.(Latest Marathi News)

विरोधीपक्ष नेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्योतिबा गुंड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना बोलताना दिली.(Latest Marathi News)

दिलीप कोल्हे यांनी पक्ष निरीक्षक, शहराध्यक्ष यांवर विविध आरोप करत पक्षाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला होता. प्रवेशावेळी शिंदे गट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे दिलीप कोल्हे, प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, संजय सरवदे, ब्रम्हदेव गायकवाड, महिला जिल्हाप्रमुख रविना राठोड, शहरप्रमुख जयश्री पवार, सुनंदा साळुंके, मनीषा नलावडे, माधुरी पवार, पुजा चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, सागर शितोळे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित खुर्द, बाळासाहेब निकम, सुधीर गोरे, राजकुमार शिंदे, प्रकाश शिंदे, जावेद पटेल, उपशहर प्रमुख विशाल कल्याणी, शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते.(Latest Marathi News)

सहा महिन्यांपासून गळती

शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. गेल्या सहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शहरात मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याआधीच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.(Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT