JEE_Exam 
महाराष्ट्र बातम्या

JEE Main 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेला जाण्याअगोदर वाचा महत्त्वाच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी जेईई मेन्स परीक्षा मंगळवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. ही परीक्षा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

एलन करिअर इन्स्टिट्यूटचे पुण्याचे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘मंगळवारी पहिल्या दिवशी आर्किटेक्ट, प्लानिंगची परीक्षा होणार आहे. त्यात एकूण ८२ प्रश्‍न विचारले जाणार असून, त्यातील ७७ प्रश्‍न सोडवायचे आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षेतील तिसरा भाग असलेल्या ड्रॉइंग टेस्टसाठी भूमितीय मोजमाप साहित्य, पेन्सील घेऊन जाता येईल. त्यावर वॉटर कलर वापरता येणार नाही.’’

‘‘२४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. यंदाचा परीक्षेचा पॅटर्न बदललेला असून, विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्‍न सोडवायचे आहेत, तसेच शहरात परीक्षा केंद्रांची संख्या दोन वरून सहा करण्यात आली आहे,’’ असे आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले.

याकडे लक्ष द्या
- परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास केंद्रावर उपस्थित राहावे.
- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटाझर सोबत नेता येईल.
- पारदर्शक पाण्याची बॉटल सोबत आता नेता येईल.
- कोणत्याही स्वरूपाची इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्रात नेता येणार नाही.
- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मास्क उपलब्ध करून दिला जाईल.
- रफ कामासाठी परीक्षा केंद्रावर ६ शीट दिल्या जातील, त्या परीक्षा संपल्यावर परत कराव्या लागतील.

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT