Jitendra Awhad bodyguard Death Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: मन सुन्न झालंय...! राज्यात आणखी एक दलित हत्याकांड; आव्हाडांच्या ट्विटनं वेधलं लक्ष

नांदेडच्या घटनेनंतर लातूरमध्ये घडलं दलित हत्याकांड

Amit Ujagare (अमित उजागरे)

लातूर : नांदेडची घटना ताजी असताना आता लातूरमध्ये दलित तरुणाच्या डोळ्यात मिरपूड टाकून बेदम मारहाण करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन हजार रुपयांसाठी एका गुंड सावकारानं हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट केलं असून "मन सुन्न झालंय..."अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Jitendra Awhad Tweet new murder of Dalit man Giriratn Tabkale in Maharashtra Latur After Nanded)

आव्हाडांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

अतिशय संतापजनक घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गिरीरत्न तबकाले या दलित समाजातील व्यक्तीनं गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10 टक्के व्याजानं घेतले. या तीन हजारांच्या बदल्यात व्याजापोटी 20 हजार रुपये वसूल करुनही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत या गावगुंडानं भर बाजारात तबकाले यांना काठीनं बेदम मारहाण केली.

या घटनेनंतर तबकाले हे रेणापूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेले पण नेहमी प्रमाणं दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही. उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकण्यात आलं. हाताला गंभीर मार लागल्यामुळं पीडित व्यक्ती हॉस्पिटलला गेली, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळं आरोपीचं बळ वाढलं. (Jitendra Awhad News)

दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजताच या सावकार गुंडानं पीडित गिरिरत्न तबकाले यांच्या घरावर हल्ला चढवला. हल्ला अतिशय क्रूरपणे करण्यात आला. यामध्ये आरोपी अन् त्याच्या भाच्यानं तबकाले यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून रॉडने जिव्हारी लागणारा हल्ला केला. या हल्ल्यात गिरिरत्न तबकाले यांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

राज्यात दलित सुरक्षित नाहीत, नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली असून याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच राज्य सरकारला प्रश्न विचारतो की मातंग समाजाचं हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT