महाराष्ट्र बातम्या

अमोल कोल्हेंच्या नथुराम भूमिकेवर जितेंद्र आव्हाड नाराज; म्हणाले, 'हे मला अजिबात...'

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आता नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) भुमिकेत दिसणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पोस्ट्सद्वारे दिली आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2017 सालचा असून तो सध्या फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 30 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Why I killed Gandhi)

यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, पक्षाचा आणि सर्वांचा काही संबंध असतो असे मला वाटत नाही. राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुरामाची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने त्यांनी भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे म्हटलंय. एकप्रकारे त्यांनी अमोल कोल्हे यांच्या या अभिनयावरुन नाराजीच व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT