Karnataka Bus Service esakal
महाराष्ट्र बातम्या

Bus Service : सीमावाद सुरु असतानाच प्रवाशांना मोठा दिलासा! कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू

दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला होता.

सकाळ डिजिटल टीम

दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला होता.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. या वादाचा पुन्हा एकदा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर झाला आहे.

या वादामुळं कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा (Maharashtra Bus Service) सुरू झाली आहे. कर्नाटकची बस बेळगावहून पुण्याला रवाना होणार असल्याचं कळतंय.

दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला होता. त्यामुळं दोन्ही राज्यांमधील वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आलं होतं. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यामुळं हा वाद आणखी पेटला, यामुळं बससेवा बंद (Karnataka Bus Service) करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा बससेवा सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT