Karuna Munde write letter to cm shinde to file case against dhananjay munde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Karuna Sharma: करुणा शर्मांचे पुन्हा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; ठाकरे, चाकणकर, फडणवीस, सुप्रिया सुळेंना घातलं साकडं

पत्रकार परिषद घेत करुणा शर्मांनी स्वतःवरील अन्यायाचा पाढा वाचला, तसेच आपल्याला कोणीही मदत करायला पुढं आलं नसल्याचं सांगितलं.

सकाळ ऑनलाईन

मुंबई : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला तसेच आपल्याला कोणीही मदत करायला पुढं आलं नसल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

"धनंजय मुंडे यांच्यासमोरच त्यांच्या गुडांनी मला मारलं" असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. (karuna sharma serious alligations accusations against dhananjay munde he appealed to thackeray chakankar fadnavis supriya sule for help)

मुलानं जीवन संपवण्याची इच्छा बोलून दाखवली

करुणा शर्मा म्हणाल्या, "धनंजय मुंडेंच्या समोर मला त्याच्या गुंडानी मारलं. आपल्या पत्नीला असं कोण मारायला सांगतं का? माझा मुलानं आत्महत्या करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आम्ही कसे जगतोय आम्हाला माहिती आहे. मी कोर्टातही दाद मागितली आहे पण कोर्टाकडून अद्याप धनंजय मुंडेंना नोटीसही पाठवलेली नाही. वांद्रे कोर्टात माझी घरगुती हिंसाचाराची केस दाखल आहे" (Latest Marathi News)

चार वेळा महिला आयोगात तक्रार दिली

"तुम्ही इतर महिलांना साथ देता मग मला का साथ देत नाही, असं मुंडेंना आवाहन करत मी चार वेळा महिला आयोगात तक्रार दिली पण काहीही झालेलं नाही. माझासारख्या इतरही अनेक महिलांवर अन्याय झाले आहेत त्यांनाही न्याय मिळालेला नाही. रुपाली चाकणकर जबाबदार पदावर आहेत त्यांनी यात लक्ष घालायला हवं," अशी मागणीही करुणा शर्मा यांनी केली आहे.

सुळेंकडून न्यायाची अपेक्षा, मोदींचीही भेट घेणार

दरम्यान, आपल्याला न्याय मिळावा यासाठी मी सुप्रीया सुळे, शरद पवार यांच्याशी भेट घेतली. उद्धव ठाकरेंची भेट झाली नाही, राज ठाकरेंही टोलचा मुद्दा घेतात मात्र, आमचे प्रश्न एकत नाहीत, वेळ देत नाहीत. आा सुप्रिया सुळेंकडून न्यायाची अपेक्षा आहे. यानंतर आता मी पंतप्रधान मोदींची भेट मागून सर्व पुरावे देणार असल्याचं सांगत आता दिल्लीत आंदोलन करणार आहे. माझा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे की, भाजपचा नारा आहे 'बेटी बचाव, बेटी पढाओ' मग मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करुणा शर्मा यांनी केली. (Marathi Tajya Batmya)

सर्वजण एकाच स्टेजवर असल्यानं न्याय कुणाकडं मागायचा?

सर्वच पक्ष एकाच स्टेजवर बसले असल्यानं न्याय कुणाकडे मागायचा? माझा जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला जबाबदार धनंजय मुंडे याचं सरकार आणि पोलीस असतील. माझा जिवाला धोका असूनही मी सुरक्षा मागूनही मला न्याय दिला जात नाही, असा आरोपही यावेळी करुणा शर्मा यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT