Kasba Bypoll Election esakal
महाराष्ट्र बातम्या

"म्हणून मी काँग्रेसचा प्रचार करतोय..." भाजपचा कट्टर नेता कसब्यात धंगेकरांच्या प्रचाराला Kasba Bypoll Election

कसब्यात भाजप नेता करतोय काँग्रेसचा प्रचार

रुपेश नामदास

कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकला आहे. तर आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने दोन्ही मतदारसंघात चांगलेच वातावरण तापले आहे.

कसब्यात भाजप विरूद्ध काँग्रेस असा थेट सामना होत आहे. भाजपकडून संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी आणल जात आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. दरम्यान ही बातमी भाजपला धक्का देणार आहे.

कसबा पोटनिवडणुकीत चक्क भाजपचा पदाधिकारी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करत असल्याची कबुली दिली आहे. या पदाधिकाऱ्याचे नाव नवनाथ रानगट असून ते पंढरपूरमधील परिचारक गटाचे पदाधिकारी आहेत.

एका वृत्तवाहिनी भाजप पदाधिकाऱ्याला विचारलं काँग्रेस उमेदवार धंगेकर यांचा प्रचार का करत आहे, ते म्हणाले की, "रविंद्र धंगेकर हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत, तसेच पंढरपूर आणि लगतच्या गावातील मुले शिक्षणासाठी पुण्यात आहेत त्यांना ते मदत करतात.

तसेच हॉस्पिटलची काही अडचण असल्यावर धंगेकर सोडवतात. त्यामुळे त्यांचा प्रचार करत आहे. मात्र मी भाजपचाच आहे आणि प्रशांत परिचार यांचा कट्टर समर्थक देखील आहे" अशी प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT