kedar dighe reaction on abdul sattar abused supriya sule demands governor to take sattar resignation 
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar: 'खोके घेऊन बोके इतके माजलेत की…', सत्तारांच्या विधानावर केदार दिघेंची तिखट प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यानंतर सत्तार यांनी वापरलेल्या भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान केदार दिघे यांनी खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत अशा शब्दात सत्तारांवर निशाणा साधला आहे.

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सोशल मिडीयावर याबद्दल पोस्ट लिहीली आहे, त्यांनी म्हटले की, "मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्या बाबत त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे…खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत."

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.

नंतर अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा सवाल जेव्हा सत्तारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा सत्तार म्हणाले, "ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती

2026 मध्ये OTT वर धुमाकूळ घालायला येताय नव्या सीरिज, प्रेम, ड्रामा, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने भरलेली ही यादी, एकदा नक्की वाचा!

Pune Municipal Election : धोकादायक २१ जागांनी वाढविली चिंता; २०१७ मध्ये एक हजारापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या जागांवर लक्ष

Kidney Transplant : आईच्या मूत्रपिंडदानातून तरुणाला नवे आयुष्य

SCROLL FOR NEXT