santosh mandlecha
santosh mandlecha sakal media
महाराष्ट्र

पर्यटनात पहिले स्थान मिळवण्याची महाराष्ट्राची क्षमता- संतोष मंडलेचा

कृष्ण जोशी

मुंबई : केरळ (keral) राज्य जरी देशात पर्यटनक्षेत्रात (tourism) प्रथम क्रमांकावर (First rank) असले तरी राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनक्षेत्रे विचारात घेता महाराष्ट्राला या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर झेप घेता येईल, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) चे अध्यक्ष संतोष मंडलेचा (santosh Mandlecha) यांनी येथे व्यक्त केला.

जागतिक पर्यटनदिनाच्या निमित्ताने चेंबरच्या पर्यटन समितीतर्फे नुकतेच येथे भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मंडलेचा बोलत होते. महाराष्ट्र राज्यात पर्यटनासाठी पोषक वातावरण आणि सोयीसुविधा आहेत. कृषी पर्यटन, धार्मिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ठिकाणे, प्राचीन गड किल्ले, डोंगर, आकर्षक समुद्रकिनारे, नद्या, धरणे, धबधबे, आधुनिक मनोरंजन पर्यटनस्थळे असल्याने महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत, असेही त्यांनी दाखवून दिले.

आपल्याकडे तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंगची सुविधा असून स्थानिक तरूणच त्याचे संचालन करतात. मुंबई व बहुतेक मोठ्या शहरांमध्ये वॉटरपार्क, अॅम्यूजमेंट पार्क आहेत. राज्यात अजिंठा, एलिफंटा सारख्या युनो ने जागतिक वारसा घोषित केलेल्या लेण्या, रागयडासारखा स्फूर्तीदायक किल्ला, निसर्गसौंदर्याची उधळण करणारे कोकण आहे. पर्यटन संस्कृती सर्वांना समजावल्यास व रुजवल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक व्यवसाय जोडलेले आहेत महाराष्ट्र राज्यात पर्यटनाचा विकास होण्याकरता प्रचंड संधी आहेत. या संधीचे सोने करणे जेवढे राज्य सरकार व पर्यटन विभागाचे कर्तव्य आहे तेवढेच कर्तव्य या क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्वांचे आहे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास महाराष्ट्र राज्य पर्यटनात प्रथम क्रमांक निश्‍चित मिळवू शकतो, असेही मंडलेचा म्हणाले.

यावेळी चेंबर च्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल यांनी केरळ व इतर राज्यात पर्यटनाचा व्यवसाय कसा वाढीस लागला याची माहिती दिली. महाराष्ट्र पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन विकास अधिकारी नेमावा. या क्षेत्रात तालुकास्तरावर काम करून पर्यटनस्थळे विकसित केल्यास स्थानिक पातळीवर व्यवसाय व रोजगार मिळेल आणि परिसराचा विकास होईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कृषी समितीच्या अध्यक्ष श्रीमती सुनीता फाल्गुने, स्वप्नील जैन, सत्यनारायण पांडे, जगदीश चौधरी, सहाय्यक सचिव अविनाश पाठक व अन्य सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT