kerala Train Fire Case esakal
महाराष्ट्र बातम्या

चालत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देणाऱ्या शाहरुखला रत्नागिरीतून अटक; तपास यंत्रणेची मोठी कारवाई

रत्नागिरीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी पोलिसांना एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.

रत्नागिरीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे. केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एकानं आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिलं होतं. यामध्ये जळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी जखमी झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी पोलिसांना एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेतील एका संशयिताला पोलिसांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी (Ratnagiri) येथून अटक केलीये. शाहरुख सैफी असं त्याचं नाव आहे.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (Central Intelligence Agency) आणि महाराष्ट्र एटीएसच्या (Maharashtra ATS) संयुक्त पथकानं कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेतील फरार संशयित आरोपीला रत्नागिरी येथून जेरबंद केलंय. केरळ पोलिसांचं (Kerala Police) एक पथकही रत्नागिरीत पोहोचलं असून, आरोपीला लवकरच त्यांच्या ताब्यात दिलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसनं दिलीये.

शाहरुख सैफीचं लोकेशन काल रत्नागिरीत ट्रेस करण्यात आलं. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळं तो रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. केरळमध्ये ट्रेनमधून खाली उतरताना पडल्यामुळं त्याला ही दुखापत झाली आहे. मात्र, उपचार पूर्ण न करताच त्यानं रुग्णालयातून पळ काढला होता.

यानंतर पोलिसांनी रत्नागिरी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवून शाहरुख सैफीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलंय. तो सध्या रत्नागिरी येथील रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कोठडीत असून त्याची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही. केरळ पोलीसही रत्नागिरीत पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT