CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र

"बस्स झाले टोमणे, आता कामं करा"; CM उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली आहे. त्यामुळे आता कामाला लागा आणि समस्या सोडवा असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही त्यांनी आठवण काढली.

उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षापासून म्हणजेच सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वेळ वाया घालवला. जनता याला कंटाळली आहे. राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आतातरी कामाला लागावे असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, राज्यात सध्या अनेक प्रश्न आहेत. एसटी संप, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण याबाबत ते काहीच बोलत नाहीत. उलट यांच्या काळात भ्रष्टाचार, गुंडगिरी,महिलांवरील अत्याचार,सामान्य कामगारांवर बेरोजगारीची वेळ, आत्महत्या वाढल्या, शेतकऱ्यांना नैराश्य आले. अशा भीषण परिस्थितीत मुख्यमंत्री टोमणे मारत विनोदातून जनतेची करमणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आठवण काढताना केशव उपाध्ये म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना खडसावले होते. दोन वर्षे केवळ घोषणाबाजी केल्यानंतर, आता घोषणा पुरे, कामाला लागा, असा जाहीर सल्ला बाळासाहेबांनी जोशी यांना दिला होता. आज बाळासाहेब असते, तर तोच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असता असाही टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT