Khalapur Irshalwadi Landslide 
महाराष्ट्र बातम्या

Khalapur Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर, मुलीला शोधण्यासाठी बापाची धावाधाव! ४ जणांचा मृत्यू

Sandip Kapde

Khalapur Irshalwadi Landslide:  रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. काल (बुधवार) रात्री ही दरड कोसळली आहे. रात्री मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. आता सकाळी उजाडल्यानंतर बचावकार्याला वेग आला आहे.

अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Khalapur Irshalwadi Landslide)

नातेवाईकांचा अश्रूचा बांध फुटला आहे. कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ या मलब्याखाली अडकले आहेत. जिवाचा आकांत करुन लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत. एक बाप त्याच्या मुलीचा शोध घेत आहे. बदलापूर वरून मुलीला शोधायला आल्याचे खचलेल्या बापाने सांगितले. त्याला प्रश्न विचारला असता त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू होते.

एनडीआरए जवानाचा मृत्यू

बचावकार्य करताना एका एनडीआरए जवानाचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य करत आहेत.

या गावात महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे हे रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे पोहचले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT