Kirit Somaiya on BMC Scam e sakal
महाराष्ट्र बातम्या

'चारशे कोटींचा घोटाळा; तीन नेते, तीन अधिकाऱ्यांसह पाच...', सोमय्यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयकर विभागाने मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav Income Tax Raid) यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यांच्या घरातून दोन कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नवीन आरोप केले असून हा चारशे कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचं सोमय्या म्हणाले.

यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना कंत्राट देताना घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. हा चारशे कोटी रुपयांचा घोटाळा असून यामध्ये तीन नेत्यांचा समावेश आहे. इतकेच नाहीतर मुंबई महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांसह ५ कंत्राटदार देखील या घोटाळ्यात सहभागी आहेत, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले आहेत.

अचानक यशवंत जाधवांच्या घरावर छापेमारी -

यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच ते महापालिकेतील सेनेचा मोठा चेहरा देखील आहेत. त्यांच्या घरावर २५ फेब्रुवारीला सकाळीच ७ वाजता आयकर विभागाने छापेमारी केली. ही कारवाई सलग पाच दिवस चालली. आयकर विभागानं घराची झडती घेतली असता त्यांच्या दोन कोटी रुपये आढळून आले. तसेच आयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्याच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटुंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटुंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अमित शाह बारामतीकडे रवाना, अजित पवार यांच्यावर ११ वाजता अंतिमसंस्कार

Ajit Pawar Baramati Police : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची पुणे ग्रामीण पोलिसात तक्रार, अपघाताचं नेमकं कारण येणार समोर...

Latest Marathi News Live Update : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

SCROLL FOR NEXT