Kirit Somaiya Criticize Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

"हिसाब तो देना पडेगा " राऊतांना समन्स मिळताच सोमय्यांचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सत्तांतराच्या घडामोडींमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं समन्स बजावले आहे. राऊत यांना जमीन घोटाळ्यात संबंधित समन्स बजावण्यात आलं असून, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे बंडखोर आमदारांमुळे अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, संजय राऊत यांना ईडीचं समन्स येताच भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ट्वीट करत राऊतांना चिमटा काढला आहे. (KIrit Somaiya Tweet On Sanjay Raut ED Summons )

सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझा पत्नीला, माझा मुलगा नीलला, आईला..... जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा.... धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या....परंतु "हिसाब तो देना पडेगा " असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics)

समन्स मिळताच राऊतांचं ट्वीट

दरम्यान, ईडीचं समन्स मिळताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टॅग केले आहे. यामध्ये राऊतांनी म्हटले आहे की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे म्हटले आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये राऊतांनी फडणवीसांनाच टॅग केल्यामुळे आता ही लढाई थेट आमने सामनेची सुरू झाली आहे.

पत्राचाळ प्रकरण नेमकं काय?

शिवसेना नेते संजय राऊत यांना बजावण्यात आलेलं हे समन्य पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी असून, हा घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. गोरेगाव येथील पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड असून, या चाळीचा विकास करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याचा तसेच यातील काही भाग खासगी विकासकाला देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. याशिवाय राऊतांवर संबंधित चाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली होती. त्याशिवाय ईडीने यापूर्वी 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT