Anil Parab News esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Parab : साई रिसॉर्ट प्रकरणातली याचिका किरीट सोमय्यांनी घेतली मागे; काय आहे कारण?

संतोष कानडे

मुंबईः मागच्या काही वर्षांपासून अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील एक याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झालीय.

साई रिसॉर्टच्या मुद्द्यावरुन भाजपने अनिल परब यांना घेरलेलं आहे. या प्रकरणात ईडीकडूही चौकशी झालेली आहे. आज किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातली याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने सोमय्यांनी याचिका मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

समुद्र किनारपट्टी नियमन अधिनियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केलेली होती. अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल होती. मात्र आज ती मागे घेण्यात आलेली आहे. हायकोर्ट आणि ईडीकडे सुरु असलेलं प्रकरण चालूच राहणार आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ईडीच्या आरोपपत्रात जरी अनिल परब यांचं नाव आरोपी म्हणून नसलं तरीदेखील या प्रकरणात अनिल परब यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाचा तपास अजुनही सुरू आहे. तर या प्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत. तर दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावाचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scholarship Exam : चौथी, सातवीच्या गुणवत्तायादीत पुणे अव्वल; ९२ विद्यार्थ्यांपैकी ८७ विद्यार्थी झेडपी शाळेतील

FDA: एफडीएची करडी नजर! वसई-विरार शहरात प्लॅस्टिकसह भेसळीवर कारवाई सुरू

Hockey World Cup Schedule: स्वातंत्र्यदिनापासून सुरू होणार थरार! IND vs PAK सामना कधी अन् कुठे पाहाता येणार? जाणून घ्या सर्वकाही

Marathi News Live Updates : 'या' तारखेला होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी

Gen Z-Gen Alpha Film Initiative: जेन झी-जेन अल्फासाठी दर्जेदार चित्रपटांचे दर्शन; स्वातंत्रदिनापासून राज्यभर १०० कॅम्पस फिल्म सोसायटीजचा उपक्रम

SCROLL FOR NEXT