Shivsena-VBA Alliance  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena-VBA Alliance : शिवशक्ती- भिमशक्ती युतीचा भाजपला फटका बसणार? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

सकाळ डिजिटल टीम

Shivsena-VBA Alliance :  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती निश्चित झाली आहे. आज २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा केली जाऊ शकते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या चर्चेला दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्रात आज क्रांतिकारी घोषणा होणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील इच्छा होती की शिवशक्ती- भिमशक्ती एकत्र यावे. त्यामुळे आजची घोषणा ही ऐतिहासिक ठरणार आहे. 

शिवशक्ती- भिमशक्ती एकत्र आली तर याचे राजकीय फायदे कसे असणार हे समजून घेऊया. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएमची युती झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला होता.  २०१९ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी २४ लाखं मते मिळाली होती. तर विधानसभा निवडणुकीत वंचितला २८ लाख मते मिळाली. वंचितचे उमेदवार १० जागांवर दुसऱ्या तर २३ ठीकाणी तिसऱ्या स्थानावर होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले. यामुळे २० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा पराभव झाला. 

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर भाजप आणि शिंदे गटाला याचा मोठा फटका बसू शकतो. मात्र वंचितची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती होणार असल्याचे स्पष्ट असले. तरी वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळेल का? यावर अजून कोणीही भूमिका स्पष्ट केली नाही. 

उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेतलं पाहिजे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती आली नाही. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत निवडणुकाल लढवल्या तर भाजपला मत विभाजनामुळे फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला नाकारले होते, पण आम्ही त्यांना नाकारले नाही. आपण केवळ दलितांपुरते मर्यादित राहावे, अशी त्यांची  इच्छा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीचे ही इच्छा आम्हाला मान्य नाही, असे आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांबाबत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.  

शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी, मला याबाबत माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे या युतीबाबत पवारांची समहती नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT