narayan rane sakal
महाराष्ट्र बातम्या

चिपी विमानतळ: उद्घाटनाला नारायण राणेंना बोलवणार? सुभाष देसाई म्हणाले....

'आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत'

वैदेही काणेकर

मुंबई: चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन (Chipi airport Inauguration) केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. चिपी विमानतळाचे श्रेय घेण्यासाठी राणे आणि शिवसेनेमध्ये लढाई सुरु झाली आहे. "आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत. हा उद्योग विभागाचा विषय आहे. नारायण राणे यांच्याबाबत माहीत नाही. पण कोणाला बोलवायचं याबाबत अजून प्रस्ताव आलेला नाही" असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) म्हणाले.

उद्योग विभाग आणि MIDC ने हा प्रकल्प हाती घेतला होता, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली. "MIDC ने प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे आज हे विमानतळ पूर्ण होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 9 ऑक्टोबरला उद्घाटन होत आहे" अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

"286 हेक्टर जमीन संपादित केली आणि विमानतळासाठी प्रस्ताव मागितले. सिंधुदुर्गवासियांना प्रतिक्षित असलेल्या या विमानतळाचं उदघाटन होणार आहे. काल मुख्यमंत्री आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं फोनवर बोलणं झालं" असे सुभाष देसाईंनी सांगितले.

"या विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल. पर्यटन व्यवसाय सिंधुदुर्गात आहे. त्याचा फायदा होईल. पर्यटक भेट देऊ शकतील" असे देसाई म्हणाले. "चिपी विमानतळाशी राजकारणाचा संबंध नाही ही सुविधा आहे. काही काळ गेला पण सुविधा महत्त्वाची आहे. धावपट्टी दोनदा करावी लागली" अशी माहिती देसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PhonePe चा 14 हजार कोटींचा IPO! 1.5 लाख कोटींचं व्हॅल्युएशन, कधी होणार शेअर बाजारात एन्ट्री? गुंतवणुकीसाठी किती पैसे लागणार?

SSC-HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल; नापास होणाऱ्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी बोर्डाची नवी रणनीती, निकाल 100 टक्के लावण्यासाठी काय आहे मास्टरप्लॅन?

कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात असं घडलं नव्हतं, एकाच सामन्यात त्रिशतक अन् ७ विकेट

Latest Marathi News Live Update : संविधान दिनानिमित्त नागपुरात 'संविधान बचाव' रॅली; कॉक्रोच जनता पार्टीचा पुढाकार

Satara News: सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार समोरासमोर; दोन्ही राष्ट्रवादींचे नेते एकाच फोटोफ्रेममध्ये, विलीनीकरणाच्या चर्चेला नवा संदर्भ

SCROLL FOR NEXT