Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'चंद्रकांतदादा हिमालयात जाणार'; पराभवानंतर काय म्हणाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष?

सकाळ डिजिटल टीम

'निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्यानं महाविकास आघाडीनं ही निवडणूक जिंकलीय.'

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दणदणीत विजय झाला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झालाय. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय झाला असून कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळालाय, तर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलंय. यावर प्रतिक्रिया देत मतदारांचा कौल मान्य असल्याचं भाजपं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हंटलंय.

निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, 'आम्हांला मतदारांचा निर्णय मान्य आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता. आम्ही वारंवार मांडत होतो की काँग्रेसनं 50 वर्ष केंद्रात, राज्यात आणि शहरात काय केलं हे मांडा. आम्ही पाच वर्षात काय केलं हे मांडतो. मात्र, आम्हांला राज्यात केवळ पाच वर्षे मिळाली. शहराच्या विकासासाठीचे अनेक प्रकल्प आम्ही केंद्राकडून मंजूर करुन घेतले आहेत. आता त्यांची टेंडर प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे विकास हाच आमचा मूळ मुद्दा होता.'

भाजपकडून लढलेल्या सत्यजीत कदमांना 77416 मतं मिळाली आहेत. त्यामुळं नागरिकांनी दिलेला कौल मान्य आहे. तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी ही लढत झाली. त्यात आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. मात्र, तरीही आम्ही इतकी मत घेतली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याने महाविकास आघाडीनं ही निवडणूक जिंकलीय. आम्ही ही निवडणूक विकासाच्या जीवावर लढली, परंतु सतेज पाटलांनी (Satej Patil) जातीवर ही निवडणूक लढवली आहे. पण, काही झालं तरी हिंदूत्व आमचा श्वास आहे. त्यामुळं हिंदुत्व तात्पुरत घेतलं नाही, असा घणाघात त्यांनी केलाय. 'हिमालयात जाईन' या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय, आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग, मी लढलो तर काय होईल? मी लढलो आणि हारलो तर हिमालयात जाईल, असं मी म्हटलं होतं, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं. दरम्यान, पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेसनं चंद्रकांत पाटील यांना त्याच वक्तव्यावरून डिवचलं आहे. शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांचे 'हिमालय की गोद मे' असे नमूद पोस्टर झळकावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT