Sanjay Raut on Refinery Project e sakal
महाराष्ट्र बातम्या

कोकणातील रिफायनरीबाबत लोकांचा निर्णय शिवसेनेला मान्य - संजय राऊत

'कोणत्याही राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही'

सकाळ डिजिटल टीम

'कोणत्याही राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही'

कोणत्याही राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही. कोकणात मच्छीमार, शेती, फळबागांना या प्रकल्पाचा धोका होऊ शकतो असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. नाणारचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही. पण या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. कोकण रिफायनरीसाठी (Konkan Refinery) लोकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा (Shivsena) विरोध नसणार आहे. रिफायनरीबाबत शिवसेना लोकांसोबत असेल असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज ते दिल्लीत बोलत होते. (Sanjay Raut on Refinery Project)

ते म्हणाले. रिफायनरीसंदर्भात काल विदर्भातील नेते अशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांनी भेट घेतली. नाणार हा प्रकल्प विदर्भात (Vidarbh) नेता आला तर त्याचे स्वागत होईल. समृद्धी महामार्गाच्या आसपास काही पाण्याच्या जागा आहेत तिथे हा प्रकल्प झाल्यास त्याचा फायदा महाराष्ट्र आणि विदर्भाला होईल अशी भूमिका आशिष देशमुख यांनी मांडली आहे. यातून हे सिद्ध होतं की, प्रकल्पाला सेनेचा विरोध नाही, लोकांचा विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा (Uddav Thackeray) याला विरोध असण्याचं कारण इतकंत आहे की, या प्रकल्पामुळं कोकणातील लोकांच्या जागा, शेती याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात नेता येत असेल त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या समितीची नेममूक करण्याचेही सुचवले आहे. प्रकल्प महाराष्ट्रात झाला मग तो कुठेही होऊदेत त्याला लोकांचा विरोध असले तर आमचा राजकीय विरोध असण्याचा प्रश्न येत नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांना (Sharad Pawar) यूपी अध्यक्ष करा यासंदर्भात ते म्हणाले, या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. कारण शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. विरोधी पक्षांची एकजूट करायची असेल आणि बिगर भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री, विरोधकांना एकत्र आणायचं असल्यास शरद पवार हे काम करु शकतात. याविषयी सर्वांनाच खात्री आहे आणि आम्ही यापूर्वीच ही भूमिका मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT