महाराष्ट्र

कोपर्डी खटला: ई सकाळवरील वार्तांकन

सकाळवृत्तसेवा

देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते. 

 कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय
कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झाला होता. या खटल्यातील दोषी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

 कोपर्डी : 13 जुलै 2016 ते 29 नोव्हेंबर 2017
नगर जिल्ह्यातील कोपर्डीत शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाचा पडसाद अवघ्या राज्यातच नव्हे, तर देशातही उमटले. मराठा समाज अफाट संख्येने रस्त्यावर आला. कोपर्डीतील आरोपींना शिक्षेसह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने अभूतपूर्व मुक क्रांती मोर्चे काढले. जुलै 2016 ते नोव्हेंबर 2017 या 17 महिन्यांत नेमके काय काय घडले...?

 न्यायालय परिसरात एक मराठा, लाख मराठा घोषणा
नगर - देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालय परिसरात मराठा संघटनांकडून एक मराठा, लाख मराठा घोषणा देण्यात आल्या.

 माझ्या छकुलीला न्याय मिळाला: पीडितेची आई
नगर - माझ्या मुलीचा बलात्कार करून खून करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा झाल्याने मी सर्व महाराष्ट्राचे आभार मानते. अखेर माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईने व्यक्त केली आहे.

कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना नेमकी काय शिक्षा झाली?
या निकालाबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कलम 109 अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी, बलात्कार केल्याप्रकरणी कलम 376 (2) अंतर्गत जन्मठेप आणि वीस हजारांचा दंड व कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 

फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणा: अजित पवार
कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना दिलेल्या फाशीच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. दोषी पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा व या नराधम आरोपींची फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT