Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam : कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; महाबळेश्‍वरला 157 मिलिमीटर पावसाची नोंद

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जलाशयात प्रतिसेकंद १७ हजार २४० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी २०४९.११ फूट झाली असून, एकूण पाणीसाठा १७.७० टीएमसी झाला आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, महाबळेश्‍वरला १५७ (Mahabaleshwar) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात जलाशयाची पाणीपातळी चार फुटाने वाढली असून, पाणीसाठा दीड टीएमसी वाढला आहे.

पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्‍वरनंतर नवजाच्या पावसाने एक हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला असून, कोयनानगर (Koynanagar) येथे एकूण फक्त ७३० मिलिमीटर पावसाची नोंद आजपर्यंत झालेली आहे. संततधार पाऊस सुरू झाल्याने कोयना विभागासह तालुक्याच्या पश्चिम भागात भात व नाचणी पुनर्लागणीच्या कामाकडे वळला आहे.

गुरुवारी रात्रीपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू झाला व आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. पूर्व भागातही पावसाच्या चांगल्या सरी येऊ लागल्या आहेत. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ७७ मिलिमीटर, नवजाला ११२ मिलिमीटर आणि महाबळेश्‍वरला सर्वांत जास्त १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जलाशयात प्रतिसेकंद १७ हजार २४० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी २०४९.११ फूट झाली असून, एकूण पाणीसाठा १७.७० टीएमसी झाला आहे. गेल्या २४ तासांत पाणीपातळी चार फुटाने वाढली असून, पाणीसाठ्यात दीड टीएमसी वाढ झाली आहे. एक महिना मॉन्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला असून, या जलवर्षात पाणीसाठ्यात दीड टीएमसीने झालेली वाढ समाधानकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT