Abdul Sattar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojna: ''बळकावलेल्या जमिनीवर लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम'' मुख्यमंत्री येणार की नाही? अब्दुल सत्तारांविरोधात पठाण कुटुंबिय आक्रमक

CM Eknath Shinde: पठाण परिवाराच्या सांगण्यानुसार त्यांनी सिल्लोड दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. महसूल विभागाकडेही अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे, असा आरोप पठाण परिवाराने केला आहे.

संतोष कानडे

Abdul Sattar News: राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम त्यांच्या मदारसंघात ठेवला आहे. मात्र ज्या जागेवर तो कार्यक्रम होणार आहे, त्या जागेवरुन मोठा वाद उभा राहिलाय.

शुक्रवारी सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेची सुरुवात जिथून होत आहे, त्या जागेवरून सिल्लोडमधल्या पठाण कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला येऊ नये, अशी विनंती त्या कुटुंबियांनी केली आहे.

''मंत्री अब्दुल सत्तार यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे जमीन बळकावली असून या जागेवर केलेले सर्व बांधकाम नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे.'' असा आरोप पठाण कुटुंबियांनी केलाय. मात्र यावर सत्तार यांनी चांगल्या कार्यक्रमावेळी या विषयावर बोलणार नसल्याचे म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • पठाण परिवाराचा आरोप आहे की, मंत्री अब्दुल सत्तार हे ज्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत ती जमीन पठाण कुटुंबियांची वडिलोपार्जित आहे.

  • सर्वे नंबर 377 मधील जमिनीचा वाद सध्या न्यायालयात असताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळजबरीने त्या जागेवर ताबा मिळवला आहे. शिवाय त्याठिकाणी बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने बांधकाम केले, असा आरोप आहे.

  • या जमिनीवर सन 2021 साली वादविवाद झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पठाण परिवारास समजपत्र दिले होते. सदर जागेवर भांडण-तंटे न करता न्यायालयातून आदेश प्राप्त करण्याबाबत पोलिसांनी सूचना केली होती.

  • पठाण परिवाराच्या सांगण्यानुसार त्यांनी सिल्लोड दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. महसूल विभागाकडेही अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे, असा आरोप पठाण परिवाराने केला आहे.

  • राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस प्रशासन, नगर विकास विभाग, महसूल विभाग यांच्याकडे ई-मेलद्वारे पठाण परिवाराने निवेदन देऊन आपला आक्षेप दाखल केला आहे. त्यामुळे शुक्रवारच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT