Adulterated Milk Cancer esakal
महाराष्ट्र बातम्या

सावधान.. तुम्ही युरिया, डिटर्जंट पावडर पित आहात! दूध, दुग्धजन्य पदार्थांत मोठी भेसळ; कर्करोग, हृदयरोगाचा वाढला धोका

भेसळखोरांकडून महाराष्ट्रात युरिया, डिटर्जंट पावडर, व्हाईट वॉलपेंट अशा रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे सर्वांत मोठा धोका कर्करोग होण्याचा आहे. त्याशिवाय हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार, अपचन, पोटदुखीही होते, असे डॉ. विजय नागावकर यांनी सांगितले.

-संतोष मिठारी

कोल्हापूर : आरोग्यासाठी (Health) दुधाचे महत्त्व फार मोठे आहे. मात्र, भेसळखोरांकडून महाराष्ट्रात युरिया, डिटर्जंट पावडर, व्हाईट वॉलपेंट अशा रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत आहे. दूध आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थांमुळे कर्करोग (Cancer), हृदयरोग, उच्च रक्तदाबासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.

सणासुदीच्या काळात दुधापासून (Milk) बनविलेल्या पदार्थांना अधिक मागणी असते. त्यात पनीर, खवा, दही, तूप, आदींचा समावेश आहे. त्यामुळे दुधाला मागणी अधिक आहे. मात्र, वाढते शहरीकरण आणि म्हैस, गायी व इतर दुधाळ प्राण्यांचे पालन करणाऱ्यांच्या घटत असलेल्या संख्येमुळे मागणीच्या तुलनेत दुधाचे उत्पादन होत नाही. पण, तरीही या पदार्थांचे उत्पादन होतच आहे.

त्यामुळे निश्चितपणे भेसळयुक्त दूध (Adulterated Milk) आणि त्यापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ बाजारपेठेत येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नवनवीन मार्गांनी भेसळ केली जात आहे. त्यावर तक्रार झाल्यानंतर तेवढीच कारवाईची मोहीम होते आणि पुन्हा भेसळखोर मोकाट होतात. त्यामुळे चार पैशांसाठी अनेक आबालवृद्धांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

कर्करोग, हृदयरोगाचा धोका

भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे सर्वांत मोठा धोका कर्करोग होण्याचा आहे. त्याशिवाय हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार, अपचन, पोटदुखीही होते, असे डॉ. विजय नागावकर यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध दूध आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

खव्याऐवजी रबडीचा पर्याय

भेसळ करणाऱ्यांकडून पूर्वी खव्यामध्ये दूध पावडर टाकून त्याची विक्री कोल्हापूर जिल्ह्यात केली जात होती. मात्र, आता त्यांच्याकडून खव्या या नावाऐवजी रबडी, सुकी रबडी अशी फॅन्सी नावे देवून विक्री करतात. या स्वरूपातील पळवाटेमुळे ते नियमानुसार पाहता खव्याच्या प्रकारात मोडत नाहीत. त्याचा परिणाम ते कारवाईच्या कक्षेत येत नाहीत. केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने सन २०२०-२०२१ दरम्यान एक सूचना जारी केली होती. त्यात प्रत्येक स्वीटमार्टधारकाने त्याच्या दुकानातील प्रत्येक दुग्धजन्य पदार्थ तयार केल्याची आणि त्याची मुदत संपल्याची तारीख लिहिण्यास सांगितले होते. त्यानुसार कारवाई सुरू केली होती. मात्र, आता ही सूचना या प्राधिकरणाने रद्द केली आहे. त्यामुळे दूध, पदार्थांचा दर्जा आणि शुद्धतेची नागरिकांनी स्वतःच खात्री करणे आवश्‍यक आहे.

म्हणजे ५० कोटी लिटर दूध भेसळयुक्त

राज्यात १४ कोटी लिटर दूधाचे उत्पादन होते. पण, ६४ कोटी लिटर दुधाची गरज आहे. म्हणजेच ५० कोटी लिटर दूध भेसळयुक्त असल्याचे दिसून येते. अशा भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी आमदार बच्चू कडू यांनी सात ऑगस्ट २०२३ रोजी केली होती. त्यावर राज्य सरकारने जिल्हास्तरीय समित्या गठीत केल्या. पण, भेसळयुक्त दुधाचा पुरवठा अद्याप थांबलेला नाही. गणेशोत्सव, दसरा-दिवाळी अशा सणासुदीच्या तोंडावर भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थांचा विषय पुढे येतो. काहीठिकाणी कारवाई होते आणि सर्व काही थंड होते. या कारवाई सातत्य राहिल्याशिवाय भेसळखोरी थांबणार नाही.

सव्वा दोन लाखांचा साठा कोल्हापूर जिल्ह्यात जप्त

एप्रिल ते डिसेंबर २०२३ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात दुधाचे ३० नमुने घेतले होते. त्यापैकी सहा नुमने प्रमाणित आले. त्यात भेसळ नव्हती. उर्वरीत २४ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. भेसळ असलेले ७० लिटर दूध एकाच ठिकाणी जप्त केले होते. त्याची किंमत २३१० रूपये होती. दुग्धजन्य पदार्थांचे ६१ नमुने घेतले आहेत. त्यातील १४ नमुने प्रमाणित आहेत. ४७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. दुग्धजन्य पदार्थांचा ६५३ किलोचा साठा जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत दोन लाख ९७० रूपये इतकी होती.

वारणा, गोकुळ संघाकडून ७० टक्के दूधाचा पुरवठा होतो. त्याची तपासणी यंत्रणा चांगली आहे. दूध अथवा त्यापासून बनविलेले पदार्थ कमी दर्जाचे आढळले तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. त्यात पाच लाख रूपयांपर्यंतचा दंड आणि हानीकारक रसायने आढळल्यास कायदेशीर कारवाई होते. दूध, दुग्धजन्य पदार्थ ताजे असल्याची खात्री लोकांनी स्वतः करावी. ते पदार्थ २४ तासांच्या आत खावेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबाबत काही शंका वाटल्यास आमच्याकडे तक्रार करावी.

-तुषार शिंगाडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर

अशी होते भेसळ

  • सर्वप्रथम दुधात पाणी मिसळून चरबी (फॅट) काढून घेतले जाते.

  • दूध अधिक शुभ्र आणि घट्ट होण्यासाठी त्यात युरिया, डिटर्जंट पावडर, स्टार्च, शाम्पू, ग्लुकोज, फॅब्रिक कलर, वनस्पती तूप मिसळले जाते.

  • भेसळ लॅक्टोमीटरच्या माध्यमातूनही ओळखता येत नाही.

  • दुधात भेसळ करण्यासाठी त्यात पहिल्यांदा सिंथेटिक केमिकल्स टाकली जातात. त्यानंतर त्यात रिफाईंड तेल, पाणी घातले जाते.

  • शाम्पू, रिफाईंड तेलात दूध घातले जाते. त्यानंतर साखरेची पावडर, पाणी टाकण्यात येते.

  • खवा आणि पनीरमध्ये स्टार्च मिसळले जाते. शुद्ध तूप अथवा लोण्यामध्ये वनस्पती तुपाची भेसळ करण्यात येते.

  • शिजलेला बटाटा,रताळ्याचा गर मिसळून भेसळ करतात.

  • रबडीमध्ये ब्लॉटिंग पेपरची भेसळ केली जाते.

  • दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, कॉटेज चीजमध्ये कोल्टार डाय मिसळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT