Sugar-Factory 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील १७ कारखान्यांचे परवाने अडकले

अनिल सावळे

पुणे - राज्यात यंदाच्या गाळप हंगामाला सुरुवात होऊन २७ दिवस झाले; तरी १७ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव त्रुटींअभावी अडकले आहेत. शेतकऱ्यांची एफआरपी रक्‍कम आणि शासकीय भागभांडवलाची रक्‍कम थकविल्यामुळे या कारखान्यांना अद्याप गाळपाचा परवाना मिळालेला नाही. दरम्यान, राज्यातील १२४ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, आजअखेर ७७ लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

राज्यात यंदाच्या गाळप हंगामाला गेल्या २२ नोव्हेंबरपासून सुरवात झाली. या वर्षी एकूण १६३ सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्‍त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी अद्याप १७ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळालेला नाही. परवाना मिळालेल्या उर्वरित १४६ साखर कारखान्यांपैकी ६८ सहकारी आणि ५६ खासगी अशा एकूण १२४ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरवात केली आहे.

काही साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्यामुळे एफआरपीची थकीत रक्‍कम देण्यासाठी पैसे नाहीत. या कारखान्यांना बॅंकेकडून कर्ज मिळत नाही. कर्ज मिळाल्याशिवाय एफआरपी देणे अशक्‍य झाले आहे. तसेच, दोन-चार कारखान्यांचा ऊस अन्य कारखान्यांनी पळविला आहे, त्यामुळे ऊसही नाही आणि गाळप परवानाही नाही, अशी स्थिती या कारखान्यांची झाली आहे.

राज्यात आजअखेर साखर कारखान्यांमध्ये ८१ लाख ८१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून ७६ लाख ६३ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उताऱ्याचे प्रमाण ९.३७ टक्‍के इतके आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Supe ST Bus Accident : सुपे घाटात एसटी बस उलटून अपघात आठ विद्यार्थी किरकोळ जखमी, दोन गंभीर, उपचार चालू

DengiAll: डेंग्यूला घाबरण्याचे दिवस संपणार? भारताची पहिली स्वदेशी लस ‘DengiAll’ लवकरच येणार

Bombay High Court : चोवीस आठवड्यांनंतर परवानगी बंधनकारक का? गर्भपातासंबंधीच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

SCROLL FOR NEXT